34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeराष्ट्रीयरंजन गोगोईवरील खटला नाकारला

रंजन गोगोईवरील खटला नाकारला

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताची न्यायव्यवस्था जीर्ण व मोडकळीस आलेली आहे. आपण तरी कुठल्या प्रश्नावर न्याय मागण्यासाठी न्यायालयाची पायरी चढणार नाही. जर तुम्हाला न्यायालयात जायचे असेल तर तुम्हाला तुमच्याच चारित्र्याची धुलाई झालेली तिथे दिसून येईल. तेथे तुम्हाला न्याय मिळत नाही हे सांगण्यात आपल्याला गैर वाटत नाही असे वक्तव्य माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी एका मुलाखतीत केले होते. भारतीय न्यायव्यवस्थेबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधात न्यायालयीन बेअदबीची कारवाई सुरू करण्यास महाधिवक्ता के.के. वेणुगोपाल यांनी परवानगी नाकारली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी माजी सरन्यायाधीश व राज्यसभेचे खासदार रंजन गोगोई यांनी केलेल्या वक्तव्यावर न्यायालयाचा अवमान केल्याचा खटला त्यांच्या विरोधात भरण्यासाठी परवानगी मागितली होती. पण ही परवानगी नाकारत वेणुगोपाल म्हणाले की, रंजन गोगोई यांच्या मुलाखतीचा आपण नीट विचार केला असून त्यांनी जे वक्तव्य केले ते न्यायसंस्थेच्या भल्यासाठीच होते. त्यातून न्यायालयीन अधिकारांच्या प्रतिमेला धक्का लागत नाही. गोगोई यांची वक्तव्ये चुकीची असली तरी त्यातून न्यायव्यवस्थेतील कमतरतांवर बोट ठेवले गेले आहे.

न्यायालयीन बेअदबीच्या कायद्यानुसार कुठल्याही व्यक्तीवर गुन्हेगारी स्वरूपाचा बेअदबीचा खटला भरण्यासाठी महाधिवक्त्यांची पूर्वपरवानगी आवश्यक असते. पण माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांना हा खटला चालवण्याची परवानगी भेटली नसल्यामुळे तूर्तास तरी माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या समोरील अडचण टळली आहे.

भारतातील टॉप पाच भिका-यांची संपत्ती ऐकून व्हाल थक्क

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या