23.5 C
Latur
Wednesday, March 29, 2023
Homeराष्ट्रीयदुस-या दिवशीही रणकंदन

दुस-या दिवशीही रणकंदन

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : अदानींच्या मुद्यावरून सर्व विरोधकांनी संसदेत स्थगन प्रस्ताव मांडण्याची मागणी केली. मात्र, सध्या अर्थसंकल्प आणि इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली जाईल. त्यानंतर अदानींबाबत चर्चेसाठी वेगळा वेळ दिला जाईल, असे लोकसभा अध्यक्ष म्हणाले. त्यावेळी विरोधकांनी सदनात जोरदार घोषणाबाजी केली. विरोधक आक्रमक झाल्याने दोन्ही सभागृहांत रणकंदन पाहायला मिळाले. त्यानंतर दोन्ही सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

हिंडनबर्गच्या अहवालातून अदानी यांच्यावर बरेच आरोप केले गेले आहेत. या गंभीर मुद्यावरून विरोधकांनी दोन्ही सभागृहांत अदानींबाबत सलग दुस-या दिवशी आक्रमक पवित्रा घेतला आणि या मुद्यावरून राज्यसभेत स्थगन प्रस्तावाची मागणी लावून धरली. सदनातील रणनीती ठरवण्यासाठी दिल्लीत सकाळी विरोधकांची बैठक राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीत कॉंग्रेस, डीएमके, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी, भारत राष्ट्र समिती, शिवसेना, राष्ट्रीय जनता दल, जनता दल युनायटेड, सीपीआय (एम), सीपीआय, एनसीपी, नॅशनल कॉन्फरन्स, इंडियन यूनिअन मुस्लिम लीग, केसी (जोस मणी), केसी (थॉमस) आणि आरएसपी हे पक्ष सहभागी झाले होते.

हिंडनबर्गच्या धक्कादायक अहवालावरून गुरुवारी संसदेत अदानींच्या मुद्यावर लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांचा गोंधळ झाला. दरम्यान ६ फेब्रुवारीला देशातील सर्व जिल्ह्यात एलआयसी आणि एसबीआय कार्यालयासमोर कॉंग्रेस निदर्शने करणार आहे.

हिंडेनबर्ग रिसर्चचा अदानी समुहाला फटका
अदानी एंटरप्रायझेसचा एफपीओ सबस्क्राईब करण्याकरिता आला, त्याचवेळी हिंडनबर्ग रिसर्चने अदानी समुहाविरोधात १०६ पानी अहवाल सादर केला आणि त्याचा फटका अदानी समुहाला बसला. यासंदर्भात अदानी समुहाने उत्तर देत हिंडनबर्ग रिसर्चवर कारवाई करणार असल्याचा खुलासा केला. मात्र भारतीय शेअर बाजारातील अदानी समुहातील कंपन्यांच्या समभागात पडझड सुरुच राहिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या