26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeराष्ट्रीयभारतातील अविवाहितांमध्ये झपाट्याने वाढ

भारतातील अविवाहितांमध्ये झपाट्याने वाढ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय संस्कृतीत विवाहाबाबत वयाचे अनेक बंधने आहेत. योग्य वयात विवाह केला पाहीजे, अशी मान्यता आहे. पण एका सर्वेक्षणामध्ये भारताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशाच्या लोकसंख्येमध्ये अविवाहित तरुणांचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याची बाब निदर्शनास आली आहे.
एका सर्वेक्षण अहवालानुसार, २०११ मध्ये देशातील एकूण तरुण लोकसंख्येपैकी अविवाहित तरुणांची संख्या १७.२% होती, मध्ये २०१९ मध्ये २३ टक्के झाली होती तर याचा आकडा आणखी वाढत आहे. याशिवाय तरुणांचे लग्नाचे वयही वाढले आहे. तरुणांचे लग्नाचे सरासरी वय २ वर्षांनी वाढल्याचीही माहिती समोर आली आहे.
नॅशनल स्टॅटिस्टीक्सच्या एका सर्वेक्षण अहवालानुसार, कधीही लग्न न केलेल्या तरुणांची संख्या २०११ मध्ये २०.८ टक्क्यांवर होती ती आता २६ टक्क्यांहून अधिक झाली आहे तर लग्न न केलेल्या महिलांची संख्या देखील २०११ मध्ये १३.५% होती, जी आता २० टक्क्यांहून अधिक झाली आहे.
या अहवालात अविवाहित तरुणांचे प्रमाण वाढण्याचे कोणतेही कारण दिलेले नसले तरी भारतात लवकर विवाह करण्याची जी प्रथा होती ती झपाट्याने कमी झाल्याचे यात सांगितले. लोकसंख्येच्या तुलनेत, सर्वात जास्त अविवाहित तरुण जम्मू आणि काश्मीरमध्ये होते, त्यानंतर उत्तर प्रदेश, दिल्ली आणि पंजाबमध्ये होते. तर केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये ही संख्या सर्वात कमी होती. लग्नाच्या वयाच्या संदर्भात गेल्या काही वर्षांत मोठा बदल झाल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.

तरुणांची संख्या कमी होणार
२०११-२०३६ च्या भारताच्या लोकसंख्याविषयक अंदाजानुसार, २०२१ मध्ये, भारताच्या एकूण १३६ कोटी लोकसंख्येपैकी सुमारे २७.३ टक्के लोक हे १५-२९ वयोगटातील तरुण होते. २०३६ पर्यंत लोकसंख्येतील तरुणांचे प्रमाण कमी होऊ लागेल, असे या अहवालात म्हटले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या