30.9 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeराष्ट्रीयबलात्कारी कुलदीप सेंगरच्या पत्नीचे तिकीट रद्द

बलात्कारी कुलदीप सेंगरच्या पत्नीचे तिकीट रद्द

एकमत ऑनलाईन

उन्नाव : येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तसेच तिच्या वडिलांची हत्या केल्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेला भाजप आमदार कुलदीप याच्या पत्नीला दिलेले तिकीट अखेर चौफेर टिकेनंतर भाजपने रद्द केले आहे.

कुलदीप सेंगर याच्यापत्नी संगिता सेंगर यांना भाजपने उत्तर प्रदेश जिल्हा पंचायत निवडणुकीचे तिकीट दिले होते. फतेहपूर चौरासी वॉर्डातून त्यांना हे तिकीट देण्यात आले होते. यानंतर भाजपवरचौफेर टिका होत होती. अखेर आज भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी संगिता सेंगर यांची उमेदवारी रद्द करण्यात आल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले.

ते म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये सध्या जिल्हा पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत भाजपच बाजी मारणार आहे. उन्नावमधील फतेहपूर चौरासी वॉर्ड क्र. २२ मधून संगिता सेंगर यांना तिकीट देण्यात आले होते, मात्र आता ते रद्द करण्यात आले आहे. त्या आता भाजपच्या अधिकृत उमेदवार नसतील. लवकरच येथे नवीन नावाची घोषणा केली जाईल, असेही स्वतंत्र देव सिंह म्हणाले.

देशात २४ तासांत १,५२,८७९ पॉझिटिव्ह रुग्ण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या