22.5 C
Latur
Sunday, September 26, 2021
Homeराष्ट्रीय१० जून रोजी दुर्मिळ सूर्यग्रहण

१० जून रोजी दुर्मिळ सूर्यग्रहण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : या वर्षाचे पहिले सूर्यग्रहण १० जून रोजी होणार आहे. तर हे वर्षातलं दुसरं ग्रहण असणार आहे. याआधी २६ मे रोजी पहिले चंद्रग्रहण झाले होते. हे सूर्यग्रहण सूर्यास्ताच्या आधी फक्त अरुणाचल प्रदेश आणि लडाखमध्येच दिसणार आहे. हे सूर्यग्रहण भारताच्या इतर भागातूनही दिसणार नाही. जरी हे पूर्ण सूर्यग्रहण असेल,तरी भारतात ते अर्धवट स्वरूपात दिसणार आहे.

हे ‘कंकणाकृती‘ सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार दुपारी १.४२ वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी ६.४१ वाजता संपणार आहे. अरुणाचल प्रदेशातील दिबंग वन्यजीव अभयारण्याजवळून संध्याकाळी ५:५२ वाजता हे सूर्यग्रहण पाहता येणार आहे. तर लडाखच्या उत्तरेकडील भागात ते संध्याकाळी ६ च्या सुमारास दिसेल.
संपूर्ण सूर्यग्रहण येथून दिसणार

हे सूर्यग्रहण उत्तर अमेरिका, उत्तर कॅनडा, युरोप आणि आशिया, ग्रीनलँड, रशियाच्या बºयाचशा भागांमध्ये दिसणार आहे. कॅनडा, ग्रीनलँड आणि रशियामध्ये अंगठीच्या आकाराप्रमाणे दिसणार आहे. तर उत्तर अमेरिका, युरोप आणि उत्तर आशियाच्या ब-याच भागांत हे केवळ अर्धवट स्वरुपात दिसेल. १४८ वर्षानंतर पहिल्यांदाच असे सूर्यग्रहण ज्योतिष शास्त्राच्या गणनेनुसार हे सूर्यग्रहण १४८ वर्षांनी जेष्ठ अमावस्येला हे ग्रहण दिसणार आहे. गुरुवारी म्हणजे १० जून रोजी हे ग्रहण लागणार आहे.

पाचवीतील मुलीची घेतली सरन्यायाधीशांनी दखल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या