24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयरतन टाटा पीएम केअर्स फंडाचे नवे ट्रस्टी

रतन टाटा पीएम केअर्स फंडाचे नवे ट्रस्टी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटा यांचा आता पीएम केअर्स फंडाच्या ट्रस्टींमध्ये समावेश झाला आहे.

पंतप्रधान कार्यालयाकडून निवेदनाद्वारे याची घोषणा केली. फंडाच्या ट्रस्टींमध्ये यापूर्वी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती के. टी. थॉमस, माजी लोकसभा उपाध्यक्ष करिया मुंडा या मान्यवर होते. या ट्रस्टींमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचाही इतर ट्रस्टींमध्ये समावेश आहे.

पीएम केअर्स फंडासाठी सल्लागार मंडळाच्या स्थापनेसाठी पुढील प्रतिष्ठित व्यक्तींना नामनिर्देशित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये भारताचे माजी नियंत्रक आणि महालेखापरीक्षक राजीव महर्षी, इन्फोसिस फाउंडेशनच्या माजी अध्यक्षा सुधा मूर्ती त्याचबरोबर टीच फॉर इंडियाचे सह-संस्थापक, इंडिकॉर्प्स आणि पिरामल फाउंडेशनचे माजी सीईओ आनंद शाह यांचा समावेश आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या