24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयसर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर रतन टाटांचे ट्विट

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर रतन टाटांचे ट्विट

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सायरस मिस्त्री यांना गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. टाटा सन्सच्या अध्यक्षपदासंदर्भात सायरस मिस्त्री यांनी दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. टाटा समूहासोबतच्या वादाच्या संदर्भात न्यायाधीशांनी ही पुनर्विलोकन याचिका फेटाळून लावली. दरम्यान, या निकालानंतर रतन टाटा यांनी ट्विट करत निकालाचे कौतुक करत आपण कृतज्ञ असल्याचे म्हटले आहे.

पुनर्विलोकन याचिकेत कोणतेही कारण सापडले नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने मार्च २०२१ मध्ये मिस्त्री यांच्या विरोधात निकाल दिला होता. त्यानंतर मिस्त्री यांच्यातर्फे पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती.

नेमके प्रकरण काय?
सायरस मिस्त्री यांना २०१६ साली टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर मिस्त्री यांच्यातर्फे या प्रकरणाला आव्हान देण्यात आले होते. तर, डिसेंबर २०१९ मध्ये त्यांनी नॅशनल कंपनी लॉ अपिलिएट ट्रिब्युनालने अशा पद्धतीने पदावरून काढण्याच्या निर्णयाला चुकीचे ठरवले होते. तसेच संबंधित पद मिस्त्री यांना परत देण्यात यावे असेही सांगितले होते. यानंतर टाटा समूहाने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.

यात न्यायालयाने नॅशनल कंपनी लॉ अपिलिएट ट्रिब्युनालच्या आदेशाला स्थगिती देत २६ मार्च २०२१ रोजी टाटा समूहाच्या बाजूने निर्णय दिला होता. यात न्यायालयाने मिस्त्री टाटा समूहाच्या अध्यक्षपदावर राहू शकत नसल्याचे स्पष्ट केले होते.

निकालानंतर रतन टाटांकडून ट्विट
दरम्यान, या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी ट्विट करत सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे. तसेच ‘सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आणि कायम ठेवलेल्या निकालाबद्दल कृतज्ञ असल्याचे म्हणत आजचा निकाल हे आपल्या न्यायव्यवस्थेची मूल्य प्रणाली आणि नैतिकता मजबूत करते, अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या