27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeराष्ट्रीयआरटी-पीसीआर चाचणीचे दर ४०० रुपये करा

आरटी-पीसीआर चाचणीचे दर ४०० रुपये करा

दोन आठवड्यात उत्तर द्या ; सर्वोच्च न्यायालयाची केंद्रासह राज्यांना नोटीस

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनाचे निदान करण्यासाठी करण्यात येणा-या आरटी-पीसीआर चाचणीचे दर देशभरात ४०० रुपये करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारसह राज्यांना नोटीस पाठवली आहे. नोटीसीवर दोन आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे निर्देशही दिले आहेत.

कोरोनाच्या आरटी-पीसीआर चाचणीच्या एकसमान दराबाबत वकील असलेल्या अजय अग्रवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. देशभरात आरटी पीसीआर चाचणीचे दर ४०० रुपये निश्चित करायला हवे. त्यामुळे कोरोना चाचण्यांमध्ये वाढ होऊन लोकांनाही फायदा होईल, असे याचिकेत म्हटले आहे. याचिकेवर न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील खंठपीठासमोर सुनावणी झाली.

सरकार जाईल त्या दिवशी आम्ही पर्याय देऊ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या