28 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeराष्ट्रीयआरबीआयचा अहवाल :तब्बल १.१ लाख कोटी मूल्याच्या नोटा गायब!

आरबीआयचा अहवाल :तब्बल १.१ लाख कोटी मूल्याच्या नोटा गायब!

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : मागील वर्षभरात १.१ लाख कोटी मूल्याच्या दोन हजार रुपयांच्या नोटा चलनामधून गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांचे एकूण मूल्य ५.४ लाख कोटींपर्यंत कमी झाले आहे. २०१८-१९ च्या आर्थिक वर्षात दोन हजार रुपयांच्या ६.५ लाख कोटी रुपये मूल्यांच्या नोटा चलनात होत्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकत्याच जारी केलेल्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.

दोन हजारच्या नोटांच्या उलट ५०० रुपयांच्या नोटा या ४ लाख कोटींनी वाढल्याचे दिसत आहे. २०१८-२९ मध्ये १०.७ लाख कोटींच्या ५०० च्या नोटा चलनात असताना २०१९-२० साली हे मूल्य १४.७ लाख कोटींपर्यंत पोहोचले. २०१९-२० च्या आर्थिक वर्षात दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली नव्हती, असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे. तसेच बीआरबीएनएमपीएलने (भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड) आणि एसपीएमसीआयएलने (सिक्युरिटी प्रिटिंग अ‍ॅण्ड मिटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) कोणताही अतिरिक्त पुरवठा केलेला नाही, असेही या अहवालात म्हटले आहे. हा अहवाल मार्च २०२० पर्यंतचा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदीची घोषणा केल्यानंतर दोन हजार आणि ५०० च्या नव्या नोटा चलनात आल्या होत्या. काळ्या पैश्यावर तसेच आर्थिक गैरव्यवहारांवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने नोटबंदीची घोषणा करत असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यानंतरही आर्थिक गुन्हेगारी कमी झाल्याचे चित्र दिसत नाही. उलट आधून-मधून बनावट नोटांचे रॅकेटही पकडले जात आहे. तसेच २ हजारांच्या नोटांचा वापर नियमित होताना दिसत नाही. यातील तब्बल १.१ लाख कोटींच्या नोटा गायब झाल्याची माहिती समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

२ हजारांच्या नोटांचा वापर घटला
मागील काही वर्षांत देशातील सर्वाधिक मूल्य असणारी चलनातील २००० रुपयांच्या नोटेचा वापर कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. २०१८ मध्ये ३३६ कोटी चलनात होता, तर २०१९ मध्ये हा आकडा सात कोटींनी कमी होऊन ३२९ वर आला. त्यानंतर २०२० साली हा आकडा कमालीचा कमी झाला आहे. २०१९ ते २०२० या कालावधीत दोन हजार रुपयांच्या ५६ कोटी नोटा चलनातून बाहेर फेकल्या गेल्या आहेत. २०२० साली दोन हजारांच्या २७३ कोटी नोटा चलनात आहेत, असे आरबीआयचा वार्षिक अहवाल सांगतो. दोन हजारच्या नोटांचे बाजारपेठेतील एकूण मूल्याची हिस्सेदारीही मागील दोन वर्षांत कमी झाली आहे. २०१८ मध्ये चलनातील ३७.३ टक्के नोटा दोन हजारांच्या होत्या. त्या आता म्हणजेच २०२० साली २२.६ टक्क्यांपर्यंत आल्या आहेत.

२ हजारांच्या नोटांची छपाई बंद केलेली नाही
केंद्र सरकारने २०१६ साली लागू केलेल्या नोटबंदीनंतर चलनात आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे अर्थमंत्रालयाने सांगितले. ठराविक मूल्याच्या नोटा छापण्याचा निर्णय सरकार आरबीआयच्या सल्ल्याने घेते. लोकांकडून दैनंदिन व्यवहारात होणा-या मागणीच्या आधारावर यांसंदर्भातील निर्णय घेतले जातात, असेही ठाकूर यांनी स्पष्ट केले. मागील काही महिन्यांपासून दोन हजारच्या नोटांसंदर्भात असणारा संभ्रम सरकारने दिलेल्या उत्तरमुळे दूर झाला आहे.

अनेक विकारांवर प्रभावी ‘शिवण’

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या