31.8 C
Latur
Tuesday, May 11, 2021
Homeउद्योगजगतआरबीआयची एचडीएफसी बँकेवर कारवाई

आरबीआयची एचडीएफसी बँकेवर कारवाई

एकमत ऑनलाईन

मुंबई : रिझर्व्ह बँकेने एचडीएफसीला नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यास मनाई केली आहे. बँकेच्या इंटरनेट सेवा नेहमी डाऊन असल्याच्या तक्रारींची दखल घेत रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे. त्याचप्रमाणे बँकेचे डिजिटल व्यवहारही थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबतच्या तक्रारींचा निपटारा झाला आहे, सर्व कार्ये जबाबदारीने आणि योग्यप्रकारे होत असल्याची खात्री झाल्यावरच ही मनाई हटवण्यात येणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.

रिझर्व्ह बँकेने एचडीएफसीवर केलेल्या या कारवाईचे वृत्त आल्यानंतर बँकेच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. शेअरचे भाव २५ रुपयांनी कमी होऊन १३८२ वर आले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून एचडीएफसी बँकेच्या डिजिटल सेवा ठप्प होत असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. खासगी क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या एचडीएफसीच्या डिजिटल सेवा २१ आणि २२ नोव्हेंबरला अनेक तास ठप्प होत्या. त्याबाबत रिझर्व्ह बँकेने एचडीएफसीकडे स्पष्टीकरण मागितले होते. ज्या केंद्रामध्ये समस्या आल्या, त्या केंद्रांची माहितीही रिझर्व्ह बँकेने मागवली होती.

डेटा सेंटरमध्ये तांत्रिक समस्या
एचडीएफसीच्या डेटा सेंटरमध्ये तांत्रिक समस्या असल्याने सुमारे १२ तास बँकेच्या युपीआय, एटीएम आणि डेबिट, क्रेडिट कार्ड सेवा पूर्णपणे ठप्प होत्या. बँकेच्या खातेधारकांना दोन वर्षात तिस-यांदा या समस्येचा सामना करावा लागला होता. दोन वर्षात तिस-यांदा अशी समस्या आल्याने रिझर्व्ह बँकेने चिंता व्यक्त केली होती.

एचडीएफसीने स्टॉक एक्सचेंजला दिली माहिती
रिझर्व्ह बँकेचे डिजिटल २.० अनुसार प्रस्तावित असलेले सर्व डिजिटल व्यवहार, आयटी अ‍ॅप्लिकेशन आणि नवीन क्रेडिट कार्ड देण्यास मनाई केल्याची माहिती एचडीएफसीने स्टॉक एक्सचेंजला दिली आहे.

रिझर्व्ह बँकेची खात्रीनंतरच मनाई हटविणार
बँकेने या तांत्रिक समस्येचा तपास करावा आणि याबाबतची जबाबदारी निश्चित करावी, असे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. तर डिजिटल सेवा ठप्प होण्याच्या घटनानंतर अशा घटना होऊ नयेत, यासाठी बँकेने उपाययोजना केल्याचे एचडीएफने सांगितले आहे. मात्र, तांत्रिक समस्यांचा निपटारा झाला आहे आणि सर्व व्यवहार सुरळित असल्याची रिझर्व्ह बँकेची खात्री झाल्यावरच ही मनाई हटवण्यात येणार आहे.

प्रकाश सिंग बादल यांनी केले ‘पद्मविभूषण’ परत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या