23.8 C
Latur
Tuesday, March 2, 2021
Home राष्ट्रीय ट्विटरवर भारतीय रिझर्व्ह बँकेची चलती

ट्विटरवर भारतीय रिझर्व्ह बँकेची चलती

१ मिलियन फॉलोअर्स ; जगात सर्वाेत्तम

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेची ट्विटरवर चांगलीच चलती असल्याचे दिसून येत आहे. बँकेच्या अ‍ॅपने ट्विटरवर १ मिलियन फॉलोअर्सचा टप्पा गाठला आहे. जगातील कुठल्याही मध्यवर्ती बँकेपेक्षा तो जास्त आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रविवारी आपल्या ट्विटरवरुन याची माहिती दिली. ‘आरबीआयच्या ट्विटर अकाउंटने आज १ मिलियन फोलॉअर्सचा टप्पा पार केला. आरबीआयमधील आमच्या सर्व सहका-यांचे अभिनंदन.’, अशा शब्दात दास यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मार्च २०१९ पासून दुप्पट वाढ
रिझर्व्ह बँक ही गेल्या ८५ वर्षांपासून भारताच्या अर्थव्यवस्थेला दिशा दाखवित आहे. आरबीआयने ट्विटरवर आपलं अकाउंट जानेवारी २०१२ मध्ये तयार केले. ३० एप्रिल २०२० पासून रिझर्व्ह बँकेच्या फॉलोअर्समध्ये अडीच लाख फॉलोअर्सची भर पडल्याने ट्विटरवर ७,५०,००० फॉलोअर्सच्या संख्येने मैलाचा दगड गाठला. २० एप्रिल रोजी आरबीआयच्या फॉलोअर्समध्ये १,३१,००० फॉलोअर्सची भर पडली. मार्च २०१९ पासून ट्विटरच्या फॉलोअर्सच्या संख्येत दुप्पट वाढ झाली. ही संख्या ३,४२,००० हून ७,५०,००० वर पोहोचली. आरबीआयनंतर ट्विटरवर इंडोनेशियाची मध्यवर्ती बँकेचा क्रमांक लागतो. या बँकेच्या ट्विटर अकाउंटचे ७,५७,५०० फॉलोअर्स आहेत. तर मेक्सिकोची मध्यवर्ती बँक बँन्को दि मेक्सिको तिसºया क्रमांकावर असून तिच्या ट्विटर हँडलचे ७,७४,२०० फॉलोअर्स आहेत.

दोन अकाऊंटद्वारे आर्थिक जनजागृती
आरबीआयची दोन ट्विटर अकाउंट आहेत. सुरुवातीच्या ट्विटर अकाउंटद्वारे बँकेच्या महत्वाच्या धोरणांबाबत माहिती दिली जात आहे. तर नव्या ट्विटर अकाउंटव्दारे लोकांमध्ये बँकिंग व्यवहारांबाबत जनजागृती करण्यात येते.

कोरोनामुळे २० लाख मुलांचा मृत्यूची शक्यता

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या