20.8 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeराष्ट्रीय११ कोळसा खाणींचा फेरलिलाव

११ कोळसा खाणींचा फेरलिलाव

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील ११ कोळसा खाणींचा फेरलिलाव करण्याची घोषणा केली आहे. या खाणींचा लिलाव करण्याचा प्रयत्न या आधीही झाला होता. आता या खाणी विकण्यासाठी दुस-यांदा तेथे लिलाव होणार आहे. रेव्हेन्यु शेअर पद्धतीने हे लिलाव केले जाणार आहेत. हे लिलाव ऑनलाईन पद्धतीने होतील अशी माहितीही सरकारतर्फे देण्यात आली आहे. या लिलावात भाग घेणा-यांना कोळसा खाणींचा पुर्वानुभव असण्याची अटकही काढून टाकण्यात आली आहे.

२७ सप्टेंबरपासून टेंडर फार्म विक्री सुरू केली जाणार आहे. या आधी आठ खाणींची विक्री लिलावाद्वारे करण्यात आली असून, त्यांनी आता त्या खाणींतून कोळसा उत्पादनही सुरू केले आहे. ऑगस्ट महिन्यात या आठ खाणींच्या लिलावाची प्रक्रिया पुर्ण झाली आहे. कोळसा मंत्रालयाने एकूण ३८ खाणी लिलावाद्वारे विक्रीसाठी काढल्या आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या