30.3 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeराष्ट्रीय‘कुठल्याही स्थितीचा सामना करण्यास सज्ज’

‘कुठल्याही स्थितीचा सामना करण्यास सज्ज’

एकमत ऑनलाईन

हैद्राबाद : आम्हाला शांतता हवी आहे, मात्र वेळ आल्यास भारत कुठल्याही स्थितीचा सामना करण्यास सज्ज आहे, देशाच्या सन्मानाशी तडजोड करणार नाही, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चीन व पाकिस्तानला इशारा दिला आहे. हैदराबादमधील दुंडिगल येथील एअरफोर्स अ‍ॅकेडमीतील पदवीदान समारंभात राजनाथ सिंह बोलत होते. ‘‘पश्चिमेकडून आपला शेजारी देश पाकिस्तान सीमेवर दुष्टकृत्य करत आहे. भारतासोबत चार युद्ध हारल्यानंतरही दहशतवादाआडून पाकिस्तान भारतासोबत छुपे युद्ध छेडतच आहे. मात्र, हे हल्ले परतवून लावणा-या सुरक्षा रक्षकांचा मी सत्कार करु इच्छितो,’ असे राजनाथसिंह यांनी सांगितले.

सैनिकांचे मानले आभार
आपल्या देशाचे तुम्ही रक्षणकर्ते आहात हे आमचं नशिब आहे. आपण आपल्या कर्तव्याला न्याय द्यालं, असा आम्हाला विश्वास आहे. बदलत्या काळासोबत देशाला असलेले धोके आणि युद्ध रणनीतीमध्येही आता बदल होत आहे, अशावेळी भारताकडे रक्षणकर्ते चांगले आहेत,अशा शब्दात राजनाथसिंह यांनी जवानांचे आभार मानले.

एनसीबीच्या चौकशीपूर्वीच अर्जुन रामपालने देश सोडला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या