24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeराष्ट्रीयदोन्ही आघाड्यांवर लढण्यास सज्ज

दोन्ही आघाड्यांवर लढण्यास सज्ज

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय हवाई दल कुठल्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. परिस्थिती उद्भवलीच तर, उत्तर आणि पश्चिम दोन्ही सीमांवर एकाचवेळी दोन आघाड्यांवर युद्ध लढण्यास भारतीय हवाई दल तयार आहे. सुरक्षेची स्थिती लक्षात घेऊन, सर्व आवश्यक भागांमध्ये मजबुतीने हवाई दल तैनात आहे. भारतीय हवाईदलाच्या क्षमतेपुढे कोणत्याही प्रकारे चीनची हवाई शक्ती सरस ठरणार नाही, असे हवाईदल प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी सांगितले.

येत्या आठ ऑक्टोबरला असणा-या हवाई दल दिनाच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. पत्रकारांनी यावेळी पुर्व लडाख सीमेवर चीन बरोबर असलेल्या तणावाबाबत प्रश्न विचारले. तेव्हा भदौरिया यांनी भारतीय हवाई दलाची स्थिती व क्षमता याबाबत माहिती दिली. भदौरिया म्हणाले की, भारताच्या क्षमतेसमोर चीनची हवाई शक्ती सरस ठरणार नाही. पण त्याचवेळी शत्रूला कमी सुद्धा लेखणार नाही. परिस्थिती उदभवलीच तर, उत्तर आणि पश्चिम दोन्ही सीमांवर एकाचवेळी युद्ध लढण्यास भारतीय हवाई दल तयार आहे.

घुसखोरीच्या चीनच्या बोंबा
प्रत्यक्ष नियंत्रण रेषनजीक भारत आणि चीन दरम्यान तणावातच चीनकडून खोटे आरोप सुरु आहेत. भारतीय सैन्याने पॅन्गाँग सरोवराजवळील एका डोंगरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, चिनी सैन्याने भारतीय सैन्याला माघारी पाठवले असल्याचा दावा चिनी माध्यमांनी केला आहे. आरोपाच्या पुष्टीसाठी एक व्हिडिओही जारी केला आहे. चीनचे सरकारी टीव्ही चॅनेल सीजीटीएन या वृत्तवाहिनीचे पत्रकार शेन शिवेई यांनी भारतीय सैन्याकडून चित्रित केलेला व्हिडिओ शेअर करून हा दावा केला आहे.

तीन वर्षात राफेल व तेजसच्या स्क्वाड्रन तयार
राफेलच्या समावेशामुळे पहिला आणि खोलवर हल्ला करण्याची क्षमता प्राप्त झाली आहे असे भदौरिया म्हणाले. पुढच्या तीन वर्षात राफेल आणि एलसीए मार्क १ तेजसच्या स्क्वाड्रन पूर्ण क्षमतेने कार्यरत होतील. हवाई दलाच्या सध्याच्या ताफ्यात आणखी मिग-२९ चा समावेश करण्यासाठी ऑर्डर देण्यात आली आहे’

‘राफेल’ पहिल्यांदाच फ्लायपास्टमध्ये सहभागी
हवाईदल दिनादिवशी सगळयांच्या नजरा राफेलकडे असतील. राफेल पहिल्यांदाच फ्लायपास्टमध्ये सहभागी होणार आहे. एकूण ५६ विमाने सहभाग घेतील. त्यात १९ हेलिकॉप्टर्स आणि सात मालवाहतूक करणारी विमाने आहेत.

ताकाचे फायदे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या