24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयबंडखोर आमदारांचा गुवाहाटी मुक्काम वाढला

बंडखोर आमदारांचा गुवाहाटी मुक्काम वाढला

एकमत ऑनलाईन

गुवाहाटी : गुवाहाटीत ठाण मांडून बसलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा मुक्काम १२ जुलैपर्यंत वाढला आहे. हॉटेल रेडिसन ब्लू येथे आधी ३० जूनपर्यंत शिंदे गटाचे असलेले बुकिंग निश्चित काळापर्यंत वाढवण्यात आले आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. दुसरीकडे भाजपने त्यांच्या सर्व आमदारांना २९ जूनपर्यंत मुंबईत पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे राज्यात सुरु झालेल्या सत्तासंघर्षाच्या नाट्यावर पडदा कधी पडणार हे मात्र सध्या तरी स्पष्ट होताना दिसत नाही.

काँग्रेसची मुख्यमंत्र्यांसोबत खलबते
दुसरीकडे महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. त्यांच्यासोबत काँग्रेस नेते अशोक चव्हाणही होते. तिन्ही नेत्यांत राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. सर्वोच्च न्यायालयाने बंडखोरांना दिलेल्या १४ दिवसांच्या संरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे. या अगोदर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या