23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयपीएमएलए कायद्याच्या निकालाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल

पीएमएलए कायद्याच्या निकालाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : ईडीचे हात बळकट करणा-या पीएमएलए कायद्यातील तरतुदींना आव्हान देणा-या याचिका सर्वोच्य न्यायालयाने गेल्या महिन्यात २७ जुलै रोजी फेटाळून लावल्या होत्या. पीएमएल कायद्यातील तरतुदींना आव्हान देणा-या तब्बल २५० याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. त्या सर्वांवर एकत्रित सुनावणी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता.

दरम्यान, या निर्णयाविरोधात सर्वोच्च पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आज मान्य केले आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी पुनर्विचार याचिका दाखल करून घेतली आहे. याचिका दाखल करून घेतल्यानंतर सरन्यायाधीशांनी ही पुनर्विचार याचिका न्यायमूर्ती खानविलकर यांनी दिलेल्या निर्णयाची आहे का? असे विचारले असताना याचिकाकर्त्याने होत तीच असल्याचे सांगितले. त्यानंतर सरन्यायाधीश आम्ही सुनावणीसाठी घेत असल्याचे म्हणाले.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने २७ जुलै रोजी याचिका फेटाळून लावताना मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन देण्याच्या कठोर अटी कायम ठेवल्या होत्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निर्णयांच्या विरोधातील हा निकाल आहे. पीएमएलए कायद्यान्वये असलेली अटकेची तरतूद, शोध मोहीम, जप्तीची कारवाई, संपत्ती गोठवणे, दिलेला जबाब पुरावा म्हणून ग्रा धरणे, ईसीआयआर प्रत न देणे या ईडीच्या अधिकारांवर सर्वोच्च न्यायालयाने २७ जुलैच्या निकालात शिक्कामोर्तब केले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या