नवी दिल्ली : उत्तर भारतातील बऱ्याच शहरांमध्ये शीतलहरींचा तडाखा पाहायला मिळत आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये तर किमान तापमान ४ अंश डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. या तापमानाने आतापर्यंतचे थंडीचे सर्व विक्रम मोडले आहेत. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशात अनेक डोंगराळ भागात अतिवृष्टी झाल्याने अनेक राज्यांमध्ये थंडीचा पारा वाढत आहे.
अधिक माहितीनुसार, उत्तर भारतातल्या अनेक भागांमध्ये सरासरी किमान तापमान ५ अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवले गेले आहे. तापमानात घट झाल्याने सर्दी आणि हिवाळी संसर्गाचा धोका वाढत असल्याचे समोर आले आहे. खरेतर, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. हवामान विभागच्या म्हणण्यानुसार, डोंगराळ भागात आणि पर्वतरांगावर जेवढ्या मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव होईल़ तेवढा थंडीचा कहर वाढेल. यामुळे नागरिकांनी सुरक्षा घेत आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये शुक्रवारी किमान तापमान ४ अंशावर होते. या तापमानाने तब्बल १० वर्षांचा विक्रमही मोडला आहे.
कारशेडवरून राजकीय सुंदोपसुंदी!