27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयदेशात तेलाची विक्रमी आयात

देशात तेलाची विक्रमी आयात

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिवाळी सणाच्या तोंडांवर सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो. देशात खाद्यतेलाच्याकिंमती घसरण्याची शक्यता आहे. देशात ऑगस्ट महिन्यात पामतेलाच्या आयातीमध्ये ८७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर सप्टेंबर महिन्यात १० लाख टन तेल आयात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या महिन्यात खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता आहे.

भारताने ऑगस्ट महिन्यामध्ये विक्रमी तेलाची आयात केली आहे. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात देशात ८७ टक्के जास्त तेल आयात करण्यात आले आहे. गेल्या ११ महिन्यातील ही सर्वाधिक आयात आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाच्या किंमती ४० टक्क्यांनी घसरल्या आहेत. पामतेलाची किंमत १८००-१९०० डॉलर मेट्रिक टनावरून घसरून १०००-११०० डॉलर मेट्रिक टन वर घसरली आहे.

पामतेलाची आयात वाढली
इतर खाद्यतेलापेक्षा स्वस्त असलेले पामतेल अधिक प्रमाणात आयात केले आहे. त्याचबरोबर देशात सणासुदीचा काळ आहे. काही दिवसांवर दसरा, दिवाळी आहे. त्यातच दिवाळीनंतर लग्नसराईचाही हंगाम येत आहे. या परिस्थितीत पामतेलाची मागणी आणखी वाढू शकते.

पामतेलावर ५.५ टक्के कर
पामतेलाची आयात वाढली असून आगामी काळात खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता आहे. तर केंद्र सरकारने पामतेलाच्या आयातीवर ५.५ टक्के कर लावला आहे. त्याचबरोबर सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलाची आयात चालू आणि पुढील वर्षासाठी शुल्कमुक्त करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या