23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयदेशात कोरोनामुक्तांमध्ये विक्रमी वाढ

देशात कोरोनामुक्तांमध्ये विक्रमी वाढ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: वृत्तसंस्था
देशाच्या वेगवेगळ्या भागात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचवेळी कोरोनामुक्त होणाºया रुग्णांची संख्या देखील मोठी आहे. दरम्यान देशात प्रथमच कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अ­ॅक्टिव्ह कोरोना रुग्णांच्या पुढे गेली आहे. ही एक दिलासादायक बाब आहे.
देशात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या २ लाख ७६ हजार ५८३ पर्यंत पोहोचली आहे. यातून आतापर्यंत देशात एकूण १ लाख ३५ हजार २०६ रुग्ण कोरोना व्हायरसमधून पूर्णपणे बरे झाले आहेत. १ लाख ३३ हजार रुग्णांवर अजूनही कोरोना व्हायरससाठी उपचार सुरु आहेत. आतापर्यंत एकूण ७ हजार ७४५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागच्या २४ तासांत २७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात कम्युनिटी ट्रान्समिशन अद्याप नाही!
देशातील करोना व्हायरसचा सर्वात मोठा हॉटस्पॉट बनलेल्या महाराष्ट्रात अजूनही कम्युनिटी ट्रान्समिशन सुरु झालेले नाही, असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ९० हजारपर्यंत पोहोचली आहे. चीनच्या वुहानला महाराष्ट्राने मागे टाकले आहे. वुहानमध्ये ८४ हजार रुग्ण होते.

Read More  तब्बल 8 दिवस हॉस्पिटलच्या बाथरूममध्ये पडून होता कोरोनाबाधित महिलेचा मृतदेह

जून महिन्यात मुंबईत दरदिवशी कोरोनामुळे सरासरी ५३ मृत्यू
मुंबईत एकाबाजूला कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढतेय तर दुसºया बाजूला कोरोनामुळे होणाºया मृत्यूचे प्रमाणही वाढत चालले आहे. जून महिन्यातल्या पहिल्या नऊ दिवसात कोरोनामुळे दररोज सरासरी ५३ मृत्यू झाले आहेत. हेच मे महिन्यात शेवटचे नऊ दिवस कोरोनामुळे दररोज सरासरी ४१ मृत्यू झाले होते.
मे महिन्यातील शेवटच्या नऊ दिवसांच्या तुलनेत जूनमध्ये मृत्यूचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढले आहे. जून महिन्यात मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत ४८१ मृत्यू झाले आहेत. एक जून रोजी ४० त्यानंतर पुढचे तीन दिवस ४९ मृत्यू झाले. पाच जूनला ५४ सहा जूनला ५८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मंगळवारी कोरोनामुळे ५८ जणांचा मृत्यू झाला.

गत २४ तासांत सुमारे १० हजार नवे रुग्ण
गेल्या २४ तासांत कोरोना व्हायरसचे ९ हजार ९८५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यादरम्यान २७९ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. देशात आज दि़ १० जून रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत कोरोनाची एकूण संख्या २ लाख ७६ हजार ५८३ होती. तर कोरोनाने मृ्त्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७ हजार ७४५ वर पोहोचली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या