24.8 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeराष्ट्रीयदेशात विक्रमी ६७ हजार रुग्णांची वाढ

देशात विक्रमी ६७ हजार रुग्णांची वाढ

एकमत ऑनलाईन

एकूण रुग्णसंख्या २४ लाखांच्या घरात, मृतांचा आकडाही ४७ हजारांवर

नवी दिल्ली : देशात कोरोनाचे थैमान अजूनही थांबलेले नाही. मागील काही दिवसांपासून रोज ६० हजारांवर रुग्णसंख्या आढळून येत आहे, तर दुसरीकडे सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनानंतरही कोरोनाबळींचा आकडाही वाढत आहे. त्यातच मागील २४ तासांत देशात प्रथमच ६६ हजार ९९९ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २३ लाख ९६ हजार ६३८ वर गेली आहे, तर ९४२ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतसंख्या ४७ हजार ३३ झाली आहे. त्यामुळे मृतांच्या आकडेवारीनुसार भारत जगात चौथ्या स्थानी पोहोचला आहे.

दिवसागणिक देशात कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होत आहे. त्यामुळे देशातील रुग्णसंख्या २४ लाखांच्या घरात गेली आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे उपचार घेणा-या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. सध्या देशात ६ लाख ५३ हजार ४२२ जणांवर उपचार सुरू आहेत. याच्या दुपटीपेक्षा जास्त रुग्णांनी म्हणजेच आतापर्यंत १६ लाख ९५ हजार ९८२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच कोरोनामुळे देशात आतापर्यंत ४७ हजार ३३ जणांचा मृत्यू झाला.

मृत्यूसंख्येत भारत चौथ्या स्थानी
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत भारत आता ब्रिटनला मागे टाकत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. भारताआधी अमेरिका, ब्राझील आणि मॅक्सिकोचा क्रमांक लागतो. १३ दिवसांपूर्वी इटलीला मागे टाकत भारत पाचव्या क्रमांकावर पोहोचला होता. आता भारत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत ४६ हजार ७०६ रुग्णांचा मृत्यू झाला. या क्रमवारीत अमेरिका (१ लाख ६८ हजार २१९), ब्राझील (एक लाख ३ हजार ९९), मेक्सिको (५३ हजार ९२९) आणि चौथ्या स्थानी भारत आहे.

राज्यात १२ हजार रुग्णांची भर
कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सत्तर टक्क्यांपर्यंत गेले असले तरी गेल्या आठवड्यापासून रोज सरासरी १२ हजार नवीन रुग्णांची भर पडते आहे. आजही राज्यात ११८१३ नवीन रुग्ण आढळून आले, तर २४ तासात तब्बल ४१३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या १९ हजार ६३ झाली आहे. आज दिवसभरात ९,११५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ९० हजार ९५८ झाली आहे, तर आतापर्यंत तपासण्यात आलेल्या २९ लाख ७६ हजार नमुन्याांपैकी ५ लाख ६० हजार १२६ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

महावितरणने साधला परिमंडलातील ५० हजार ग्राहकांशी फोनद्वारे संपर्क

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या