22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयकर्नाटकात विक्रमी पाऊस

कर्नाटकात विक्रमी पाऊस

एकमत ऑनलाईन

बंगळूरू : देशाच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कर्नाटक राज्यात देखील मुसळधार पावसाने कहर केला आहे. सध्या सुरु असलेल्या पावसाने गेल्या ९० वर्षांचा विक्रम मोडला आहे. या पावसामुळे कर्नाटकातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. विशेषत:आयटी शहर म्हणून ओळख असलेल्या बंगळुरुमध्ये पावसामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. मोठ्या प्रमाणावर वाहतुकीवर परिणाम झाला आहे. बंगळुरुमधील ड्रेनेज मार्गांवर अतिक्रमण झाल्यामुळे रस्त्यांवर पाणी आल्याचे बोलले जात आहे.

घरांमध्येही शिरले पुराचे पाणी
कर्नाटकात सध्या पावसाने हाहाकार घातला आहे. गेल्या ९० वर्षाचा पावसाचा विक्रम त्याठिकाणी मोडला आहे. या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी झाले आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले असून घरांमध्येही देखील पाणी शिरले आहे. सर्वसामान्यांचे जीवन पूर्णपणे अस्ताव्यस्त झाले आहे. रस्त्यांवर पुराचे पाणी साचल्याने शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून कर्मचा-यांना घरुन काम करावे लागत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या