20.1 C
Latur
Monday, January 30, 2023
Homeराष्ट्रीयदूध उत्पादन खर्चात विक्रमी वाढ

दूध उत्पादन खर्चात विक्रमी वाढ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दुधाळ जनावरांच्या चा-याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. चा-याचे दर हे मागील ९ वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत.

दूध उत्पादनाचा खर्च अव्वाच्या सव्वा वाढला असून पुशखाद्याच्या किंमतीने विक्रम मोडल्याने पशुपालकांची चिंता वाढली आहे. दुधाच्या उत्पादन खर्चात यावर्षी मोठी वाढ झाली आहे. दुधाळ जनावरांच्या चा-याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यावर्षी ऑगस्टमध्येच पशुखाद्याच्या किंमती २५.५४ टक्क्यांनी वाढल्या होत्या. परंतू नोव्हेंबरपर्यंत हा आकडा वाढला आहे.

सध्या चा-याच्या किंमतीत २७.६६ टक्क्यांवर पोहोचल्या आहेत. जनावरांच्या चा-याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने दुग्ध व्यवसाय करणा-या पशुपालकांचा उत्पादन खर्च वाढला आहे. चा-याच्या दरात सतत होणारी वाढ ही पशुपालकांची चिंता वाढणारी आहे. यामुळे पशुपालन करणा-या ग्रामीण कुटुंबांचा खर्च वाढला आहे. चांगल्या दुग्धोत्पादनासाठी जनावरांना चारा दिला जात नाही. जनावरांच्या आरोग्यासाठीही ते आवश्यक आहे. मात्र, गेल्या काही महिन्यातील वाढत्या महागाईमुळे पशुपालकांची चिंता वाढली आहे.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने घाऊक किंमत निर्देशांकची आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये नोव्हेंबरमध्ये पशुखाद्याचे निर्देशांक मूल्य २२५.७ नोंदवले गेले आहे. मागील वर्षी हेच निर्देशांक मूल्य १७६.८ नोंदवले गेले होते. या आकडेवारीनुसार वर्षभरात चा-याच्याकिंमतीत २८ टक्क्यांची वाढ झाली आहे. पशुखाद्याबरोबरच कुक्कुट खाद्याच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. डिसेंबर २०२१ पासून पशुखाद्य आणि धान्याच्या किंमती वाढत आहेत. गेल्या १० महिन्यांपासून या किंमती सातत्याने वाढत आहेत.

देशात पशुखाद्याचा तुटवडा
१३ डिसेंबरला लोकसभेतही पशुखाद्याच्या महागाईच्या संदर्भातील मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यावर केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी सांगितले की, देशात अजूनही पशुखाद्याचा तुटवडा आहे. त्यामुळं देशात पशुखाद्याच्या किंमतीत वाढ होत आहे. देशात ११.२४ टक्के हिरव्या चा-याची २३.४ टक्के कोरड्या चा-याची कमतरता असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

१०० चारा-उन्मुख एफपीओची मान्यता
सध्या देशात चा-याचे कोणतेही संकट नाही. मात्र चा-याच्या तुटवड्यामुळे दरात थोडी वाढ झाली आहे. यावर उपाय म्हणून कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाला चारा प्लस मॉडेल अंतर्गत १०० चारा-उन्मुख एफपीओ तयार करण्यास मान्यता दिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या