24.4 C
Latur
Friday, February 26, 2021
Home राष्ट्रीय पंतप्रधान मोदींचे ट्विटर अकाउंट हॅक झाले

पंतप्रधान मोदींचे ट्विटर अकाउंट हॅक झाले

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली – कोरोनाच्या संकटकाळात सायबर गुन्ह्यात सातत्याने वाढ होत आहे. त्यात आर्थिक फसवणुकीपासून ते सोशल मीडिया अकाऊंट हॅक होण्यापर्यंत या सगळ्या घटनांचा समावेश आहे. आता चक्क देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक वेबसाईटचे ट्विटर अकाऊंटच हॅकर्सने हॅक केले आहे. नरेंद्र मोदी यांच्या नावे असलेलं ट्विटर अकाऊंट हॅकर्सने हॅक केले आणि पीएम केअर फंडासाठी डोनेशन म्हणून हॅकरने चक्क बीटकॉईनची मागणी केली. हे ट्विट नंतर हॅकरने तात्काळ डिलीट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक वेबसाईटचे ट्विटरवर अकाऊंट असून narendramodi_in नावाने ट्विटरवर पंतप्रधान मोदी यांच्या वेबसाईटचे अकाऊंट आहे. हे अकाऊंटच हॅक करण्यात आल्याची घटना घडली. हॅकरने पंतप्रधान मोदी यांच्या वेबसाईटचे ट्विटर अकाऊंट हॅक केल्यानंतर क्रिप्टो करन्सीसंदर्भातील ट्विट केले गेले. दरम्यान एक असे ट्विट करण्यात आले की, सगळ्यांना मी आवाहन करतो की, कोविड-१९ साठी बनवण्यात आलेल्या पीएम रिलीफ फंडाला मदत करा. पहिल्या ट्विटमध्ये हॅकरने म्हटले होतं की, कोविड-१९साठी उभारण्यात आलेल्या पीएम केअर फंडाला उदारपणे देणगी देण्याचे आवाहन मी करतो. आता भारतात क्रिप्टो चलनाला करन्सी सुरूवात होत आहे. कृपया देणगी म्हणून बीटकॉईन दान करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अधिकृत ट्विट, असे पहिले ट्विट करण्यात आले.

त्यानंतर दुसऱ्या ट्विटमध्ये जॉन विकने ([email protected]) हे अकाऊंट हॅक केले आहे. पेटीएम मॉल आम्ही हॅक नाही केल्याचे हॅकरने म्हटले होते. हे दोन्ही ट्विटनंतर डिलीट करण्यात आले. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्या वैयक्तिक संकेतस्थळाचं ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याने चर्चा सुरू झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वैयक्तिक वेबसाईटचे ट्विटरवर अकाऊंट आहे. जे अधिकृत (व्हेरिफाईड) असून, २५ लाख लोक ज्याला फॉलो करतात. हे अकाऊंट ज्यांनी हॅक केले. त्या ग्रुपचे जॉन विक असे नाव आहे. ३० ऑगस्ट रोजी सायबर सुरक्षा फर्म असलेल्या साईबलने असा दावा केला होता की, जॉन विक ग्रुपचा पेटीएम मॉल डाटा चोरीमध्ये हात आहे. पेटीएम मॉल युनिकॉर्न पेटीएम ई-कॉर्मस कंपनी आहे. पण पेटीएमने चौकशीनंतर माहिती चोरी झाल्याची कुठलीही घटना झाली नसल्याचे म्हटले होते.

आरोग्यमंत्री म्हणाले….श्रीमंत लोक गरज नसताना ICU बेड घेतात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या