33.7 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home राष्ट्रीय रेल्वेत विना परिक्षा ४ हजार ४९९ जागांसाठी भरती

रेल्वेत विना परिक्षा ४ हजार ४९९ जागांसाठी भरती

एकमत ऑनलाईन

कोरोनाच्या संकटकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अशामध्ये काही सरकारी कंपन्या, बँका, रेल्वे खाते यांनी बेरोजगारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. दरम्यान, भारतीय रेल्वेनेही नोकरीची संधी दिली असून ४ हजार ४९९ जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. विशेष म्हणजे ही भरती विना परिक्षा केली जाणार आहे. तसेच उमेदवारांची निवड १० वीच्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे.

इच्छुकांसाठी या आहेत महत्त्वाच्या गोष्टी –

 • एनएफआर आरआरसी रिक्रुटमेंट २०२० साठी अर्ज करण्याची ही https://rrcnfr.co.in लिंक
 • भरतीमध्ये कोणत्याही प्रकारची लेखी परिक्षा होणार नाही
 • उमेदवारांची निवड १० वीच्या गुणांच्या आधारे केली जाणार
 • ऑनलाईन अर्जाची सुरूवात १६ ऑगस्ट २०२०
 • अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२०
 • या भरतीसाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाची १० वी परिक्षा उत्तीर्ण केलेली असावी
 • कमीतकमी ५० टक्के गुण असावेत
 • उमेदवार आयटीआय ट्रेड उत्तीर्ण असावा
 • उमेदवाराचे वय १५ ते २४ वर्ष असावे
 • आरक्षणासाठी वयामध्ये सूट दिली जाणार आहे
 • १ जानेवारी २०२० नुसार वय पाहिले जाईल
 • एससी/एसटी, पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही
 • अन्य वर्गांसाठी १०० रुपये शुल्क आकारले जाईल

बॉक्सर सरिता देवीला कोरोनाची लागण; इम्फाळ येथील रुग्णालयात उपचार सुरू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या