23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयमाओवादी संघटनांकडून होणा-या हिंसाचारात घट

माओवादी संघटनांकडून होणा-या हिंसाचारात घट

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात अतेरिकी डाव्या संघटनांकडून होणा-या हिंसाचारात मोठी घट झाल्याची माहिती गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत बोलताना दिली. अतिरेकी डाव्या संघटनांकडून होणा-या हिंसाचारात ७७ टक्के घट झाली आहे. सन २००९ मध्ये आजवर मोठ्या प्रमाणावर हिंसाचाराच्या घटना घडल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

नित्यानंद राय म्हणाले, डाव्या अतेरिकी संघटनांकडून होणा-या हिंसाचारात ७७ टक्क्यांनी घट झाली आहे. देशात अशा प्रकारच्या हिंसाचाराचे प्रमाण सन २००९ मध्ये सर्वाधिक होते. त्यावेळी २२५८ हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. तर सन २०२१ मध्ये ५०९ घटना घडल्या. त्यामुळे गेल्या बारा वर्षात माओवादी, नक्षलवादी संघटनांकडून झालेल्या हिंसाचारांच्या घटनांमध्ये मोठी घट झाली आहे. त्याचबरोबर या हिंसाचाराच्या घटनांमध्ये झालेल्या मृतांच्या संख्येतही मोठी घट झाल्याची माहिती गृहराज्यमंत्र्यांनी दिली. या मृत्यूंमध्ये ८५ टक्क्यांनी घट झाली असून सन २०१० मध्ये १००५ मृत्यू झाले होते तर सन २०२१ मध्ये १४७ मृत्यूंची नोंद झाली.

वैयक्तिक माहिती सार्वजनिक नाही : राय
नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सशिवाय इतर कोणताही डेटाबेस तयार करण्यासाठी वैयक्तिक डेटा वापरला जात नाही. जनगणनेत गोळा केलेली वैयक्तिक माहिती सार्वजनिक केली जात नाही. विविध प्रशासकीय स्तरांवर केवळ एकत्रित जनगणनेची आकडेवारी जाहीर केली जाते, अशी माहिती देखील यावेळी गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत दिली.

प. बंगालपासून झाली होती सुरूवात
१९६७ साली बंगालमधील नक्षलबारी भागात भूमिहीन शेतमजूर आणि बटाईदारांनी चारू मुजुमदार, कानू संन्याल आणि जंगल संथाल या तिघांच्या नेतृत्वाखाली जमीनदारांविरुद्ध आंदोलन सुरू केले. आंदोलनकर्त्यांनी २७४ चौरस मैल प्रदेशातील शेतजमिनीवर ताबा मिळवला होता.

क्रांती घडवून आणण्यासाठी शस्त्रांचा वापर
क्रांती घडवून आणण्यासाठी पोलादी शिस्तीचा पक्ष, जनसेना आणि संयुक्त आघाडी या तीन जादूई हत्यारांची गरज असते. शस्त्रबळाद्वारे राज्यसत्ता हिसकावणे, युद्धाद्वारे तंटे सोडवणे हेच क्रांतीचे केंद्रीय काम व सर्वोच्च रूप आहे. जर तुम्हाला झाडावरच्या माकडांना घाबरवायचे असेल तर झाडाखाली कोंबडी कापा.. आपसूकच ध्येय साध्य होईल. माओच्या या तीन वाक्यांत या देशात सुरू असलेल्या नक्षलवादी चळवळीचा इतिहास सामावलेला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या