19.5 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeराष्ट्रीय२४ तासात ४० हजार नव्या रुग्णांची नोंद

२४ तासात ४० हजार नव्या रुग्णांची नोंद

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : प्रदीर्घ लॉकडाऊननंतर आर्थिक गाडी रूळावर आणण्यासाठी केंद्र शासनाने लॉकडाऊनच्या अटी काही प्रमाणात शिथील केल्या. त्यानंतर गेल्या 15 दिवसांपासून कोरोनाग्रस्तांची संख्या भलतीच वाढली आहे. आज तर कोरोनाबाधितांच्या संख्येने 11 लाखांचा आकडा पार केला आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 40,425 कोरोनाबाधित केसेस समोर आल्या आहेत. आतापर्यंतची एका दिवसातली ही कोरोनाबाधितांची सर्वाधिक नोंद आहे.

भारतातली कोरोनाबाधितांची एकूण संख्या आतापर्यंत 11 लाख 18 हजार 043 इतकी झाली आहे. तर गेल्या 24 तासांत दुर्दैवाने 681 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, अशी माहिती केंद्रिय आरोग्य विभागाने दिली आहे.

देशात सध्या 3 लाख 90 हजार 459 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 7 लाख 87 रूग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. म्हणजेच एकूण अ‌ॅक्टीव्ह केसेसपैकी डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या कितीतरी पटीने जास्त आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे भारताचा रिकव्हरी रेट सुधारून आता तो 63 टक्क्यांच्या वरती गेला आहे.

देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचा कहर आहे. राज्यात कालच्या दिवसभरात कोरोनाच्या ९५१८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख २८ हजार ७३० रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

Read More  संपादकीय : भय इथले संपत नाही़!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या