नवी दिल्ली :भारत आणि चीन यांच्या सध्याच्या घडामोडीमुळे या वर्षी 10 जून रोजी भारतातील व्यापाऱ्यांच्या संघटनेने देशातील राख्या उत्पादकांना देशातील कच्च्या मालावर आधारीतत राख्या निर्माण करण्याचा आग्रह केला होता. या एक महिन्याच्या काळात भारतात स्वदेशी बनावटीचा तब्बल एक कोटी राख्या तयार करण्यात आल्या.
दरवर्षी लाखो चिनी राख्या भारतात येत असतात. या वर्षी एकही चिनी राखी भारतात आली नाही. व्यापाऱ्यांच्या संघटनेचे नेते बी सी भारतीया यांनी सांगितले की, भारतात दरवर्षी 50 कोटी राख्या विकल्या जातात. त्यांची किंमत सहा हजार कोटी रुपये आहे. त्यात चार हजार कोटी रुपयांच्या राख्या चीनमधून मागवल्या जात असत. यावेळी मात्र भारतीय व्यापाऱ्यांनी चिनी राख्यांवर बहिष्कार टाकल्यामुळे चीनच्या कंपन्यांना 4 हजार कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. या क्षेत्रात भारत पूर्णतः स्वावलंबी होऊ शकतो हे भारताने दाखवून दिले आहे.
यावर्षी पूर्ण राख्या भारतातच तयार करण्यात आल्या आहेत. भारतातील व्यापारी संघटनांनी चीनविरोधात वातावरण निर्माण करण्यासाठी चांगलाच पुढाकार घेतला आहे. व्यापारी संघटनांनी देशी बनावटीच्या राख्या सरहद्दीवरील सैनिकांना पाठविल्या आहेत. आगामी काळातही चिनी उत्पादने भारतात येऊ नयेत यासाठीयापारी संघटना विविध पातळ्यांवर प्रयत्न करणार आहे.
Read More पाकिस्तानी न्यूज चॅनेल DAWN हॅक, स्क्रीनवर तिरंगा