28.9 C
Latur
Wednesday, January 20, 2021
Home उद्योगजगत रिलायन्स जिओने केली नवीन पोस्टपेड प्लॅनची घोषणा

रिलायन्स जिओने केली नवीन पोस्टपेड प्लॅनची घोषणा

एकमत ऑनलाईन

रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी नवीन पोस्टपेड प्लॅनची घोषणा केली आहे. हे प्लॅन जिओ पोस्टपेड प्लस नावाने आणण्यात आले आहेत. कंपनीने 5 प्लॅन्स लाँच केले असून, यातील सुरुवातीचा पोस्टपेड प्लॅन 399 रुपयांचा आहे. या प्लॅन्सची खास गोष्ट म्हणजे यात ग्राहकांना नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ आणि डिज्नी+ हॉटस्टारचे मोफत स्बस्क्रिप्शन मिळणार आहेत.

399 रुपयांचा प्लॅन –

या प्लॅनमध्ये 75 जीबी डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि मेसेजची सुविधा मिळेल. याशिवाय नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ आणि डिज्नी+ हॉटस्टार व्हीआयपीचे स्बस्क्रिप्शन मोफत मिळेल. प्लॅनमध्ये 200 जीबी डेटा रोलओव्हर केला जाईल.

599 रुपयांचा प्लॅन –

या प्लॅनमध्ये 100 जीबी डेटासह अनलिमिटेड कॉलिंग आणि मेसेजिंग सुविधा मिळेल. तसेच, नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ आणि डिज्नी+ हॉटस्टार व्हीआयपीचे स्बस्क्रिप्शन मिळेल. यात 200 जीबी डेटा रोलओव्हर केला जाईल आणि फॅमिली प्लॅनसोबत 1 सिम कार्ड देखील मिळेल.

799 रुपयांचा प्लॅन –

या प्लॅनमध्ये 150 जीबी डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि मेसेजिंग सुविधा मिळेल. नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ आणि डिज्नी+ हॉटस्टार व्हीआयपी या ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे स्बस्क्रिप्शन मोफत मिळेल मिळेल. याशिवाय 200 जीबी डेटा रोलओव्हर केला जाईल आणि फॅमिली प्लॅनसोबत 2 सिम कार्ड देखील मिळेल.

999 रुपयांचा प्लॅन –

या प्लॅनमध्ये 200 जीबी डेटासह अनलिमिटेड कॉलिंग आणि मेसेजिंग सुविधा मिळेल. तसेच, नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ आणि डिज्नी+ हॉटस्टार व्हीआयपीचे स्बस्क्रिप्शन मिळेल. यात 500 जीबी डेटा रोलओव्हर केला जाईल आणि फॅमिली प्लॅनसोबत 3 सिम कार्ड मिळतील.

1,499 रुपयांचा प्लॅन –

या प्लॅनमध्ये 300 जीबी डेटासह अनलिमिटेड कॉलिंग आणि मेसेजिंग सुविधा मिळेल. तसेच, नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ आणि डिज्नी+ हॉटस्टार व्हीआयपीचे स्बस्क्रिप्शन मिळेल. यात 500 जीबी डेटा रोलओव्हर केला जाईल. याशिवाय अमेरिका आणि यूएईमध्ये देखील अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगची सुविधा मिळेल.

अभिनेत्री आशालता यांच्या निधनाने अष्टपैलू, गुणी कलाकार गमावला – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या