वाराणसी : नव्याने बांधण्यात आलेल्या काशी विश्वनाथ धाममध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांमध्ये आणखी एका सुविधेची भर पडणार आहे. काशीतील विश्वनाथ मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी दररोज भाविक मोठ्या संख्येने येतात. आता काशीविश्वनाथाच्या दर्शनासोबतच मंदिर परिसरात धार्मिक कार्य तसेच लग्न कार्य करण्याची संधी भक्तांना मिळणार आहे.
विश्वनाथ मंदिर प्रशासनाने त्याची संपूर्ण रूपरेषा तयार केली आहे. या संदर्भात काशी विश्वनाथ मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील वर्मा म्हणाले की, जेव्हा पासून विश्वनाथ धामचा जीर्णोद्वार करण्यात आला आहे, तेव्हापासून आम्ही भक्तांसाठी अनेक उपक्रम सुरू करत आहोत. अक्षय दर्शन, धार्मिक कार्य असो किंवा सामाजिक कार्य असो, विश्वनाथ धाममध्ये चर्चासत्र असो की लग्न, त्यासाठीही आम्ही नियोजन करत आहोत, असे त्यांनी सांगितले.
भाविकांचे हित लक्षात घेऊन जी काही धार्मिक कार्ये पुढे नेली जात आहेत. त्यांच्या धार्मिक कार्यात वाढ व्हावी यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत असतो. लग्न आणि सामाजिक कार्यासाठी एक खासगी कॉंन्ट्रॅक्टर नेमणार असल्याचे सांगितले.