25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeराष्ट्रीय‘रेमडेसिवीर’ जीव वाचविणारे औषध नाही

‘रेमडेसिवीर’ जीव वाचविणारे औषध नाही

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्रासह इतर काही राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर मिळवण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे दृश्य आहे. एकीकडे रेमडेसिवीरची मागणी प्रचंड वाढलेली असताना महाराष्ट्राच्या कोवीड- १९ टास्क फोर्सचे सदस्य डॉ़ शशांक जोशी यांचे रेमडेसीवीरबद्दलचे ट्विट करत महत्वाची माहिती दिली आहे.

डॉ. शंशाक जोशी म्हणतात, कोविड -१९ मध्ये रेमेडेसिवीरचा समजूतदारीने वापर करणे आवश्यक आहे आणि त्याचा गैरवापर रोखणे देखील आवश्यक आहे.
रेमडेसिवीरच्या वापराने मृत्यूदर कमी होत नाही : डॉ़ राहुल पंडित

१. रेमडेसिवीर ही प्रायोगिक व संशोधनात्मक औषध आहे, ज्याचा कोविड-१९च्या उपचारात वापरासाठी परवानगी दिली गेली आहे.
२. कोरोनामध्ये रेमडेसिवीर हे जीव वाचवणारे औषध नाही, या औषधामुळे मृत्यूदर कमी झाल्याचे अभ्यासातून दिसून आलेले नाही.
३. रेमडेसिवीरमुळे रूग्णालयातील रूग्णाचे दिवस कमी होत असल्याचे दिसून आले आहे.
४. रेमडेसिवीर केवळ आणि केवळ रूग्णालयताच दिले जावे
५. रेमडेसिवीर हे मध्य आजारी व आॅक्सिजन घेत असलेल्या रूग्णाला देण्याचा सल्ला आहे. हे केवळ आजारपणातील पहिल्या ९ ते १० दिवसांमधील पाच दिवसांसाठीच दिले जावे़
६. रेमडेसिवीर घरी दिले गेले नाही पाहिजे.
७. अनावश्यक व असमंजसपणे रेमडेसिवीरचा वापर करणे हे अनैतिक आहे.

राज्यात दिवसभरात ५०३ रूग्णांचा मृत्यू; ६८ हजार ६३१ कोरोनाबाधित वाढले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या