24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयचक्क मृतांनाच देण्यात आले रेमडेसिवीर इंजेक्शन?

चक्क मृतांनाच देण्यात आले रेमडेसिवीर इंजेक्शन?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात कोरोना काळात रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे, अनेक ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून अधिकचे पैसे घेऊन तसेच काळाबाजार करून हे इंजेक्शन विकले जात आहे. अशीच एक भयंकर घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील हॅलट रुग्णालयामधील कोरोना वॉर्डात काम करणा-या आरोग्य कर्मचा-यांनी मृत व्यक्तींच्या नावावर अनेक दिवस औषध साठ्यामधील रेमडेसिवीर इंजेक्शन काळ्याबाजारात विकल्याची माहिती आता समोर आली आहे.

आरोग्य कर्मचा-यांच्या हव्यासापोटी ज्यांना या इंजेक्शनची गरज होती त्यांना हे इंजेक्शन रुग्णालयाकडे असूनही मिळाले नाही. कोरोना वॉर्डमध्ये काम करणा-या आरोग्य कर्मचा-यांना डॉक्टरांची चिठ्ठी असल्यावरच स्टोअर रुममधून रेमडेसिवीरसारखी औषधे दिली जातात. मात्र न्यूरो सायन्स विभागाने केलेल्या तपासामध्ये अनेक मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नावे रेमडेसिवीर इंजेक्शन स्टोअरमधून घेऊन जाण्याचे आल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच एखाद्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतरही त्याच्या नावाने आरोग्य कर्मचारी रेमडेसिवीर इंजेक्शन रुग्णालयाच्या औषध साठ्यामधून मिळवत होते.

अनेक मोठ्या डॉक्टरांचा समावेश?
धक्कादायक प्रकाराचा खुलासा झाल्यानंतर समोर येणा-या माहितीमध्ये रुग्णालयातील अनेक मोठ्या डॉक्टरांचा यात समावेश असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ३० एप्रिल रोजी गुन्हे शाखेच्या टीमने हॅलटमधील दोन कर्मचा-यांना रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करताना रंगेहाथ पकडले होते़

९० टक्के ऑक्सिजन बेड रिकामे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या