25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeराष्ट्रीयरेमडेसिवीर स्वस्त - केंद्र सरकारचा मोठा निर्णय

रेमडेसिवीर स्वस्त – केंद्र सरकारचा मोठा निर्णय

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुस-या लाटेतही मोदी सरकारने दिलासादायक बातमी दिली आहे़ कोरोनाच्या कोट्यवधी रुग्णांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सरकारने कोरोनाच्या उपचारात उपयुक्त असलेल्या रेमडेसिवीरच्या किमतीत सुमारे ५० टक्क्यांनी कपात केली.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने म्हटले आहे की, देशात रेमडेसिवीरचे सात उत्पादक असून, त्यांची क्षमता दरमहा सुमारे ३८.८० लाख युनिट आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार औषध निर्मिती विभाग देशातील उत्पादकांच्या संपर्कात असून, औषधाचे उत्पादन वाढवण्याच्या प्रयत्नात आहे.

औषधांची किंमत ३५०० रुपयांपेक्षा कमी
रेमडेसिवीरच्या उत्पादन सुविधांचा विस्तार करण्यासाठी आणि त्यांची क्षमता, उपलब्धता वाढविण्यासाठी सरकार सर्व आवश्यक पावले उचलत आहे. दुस-या ट्विटमध्ये गौडा म्हणाले, सरकारच्या हस्तक्षेपानंतर रेमडेसिवीर प्रमुख उत्पादकांनी १५ एप्रिल २०२१ पासून स्वेच्छेने त्याची किंमत ५,४०० रुपयांवरून ३,५०० रुपयांपेक्षा कमी केली.

टंचाई आढाव्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी विहिरींवर!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या