35 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeराष्ट्रीयप्रख्यात शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे अमेरिकेत निधन

प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे अमेरिकेत निधन

एकमत ऑनलाईन

मुंबई : प्रख्यात शास्त्रीय गायक आणि संगितकार पंडित जसराज यांचे अमेरिकेत निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. सध्या न्यूजर्सी येथे असलेल्या पंडीत जसराज यांना काल रात्री थोडा त्रास होत होता. त्यांच्या शिष्यांनी रुग्णालयात दाखल करण्या संदर्भात विचारले असता त्यांनी नकार दिला. आज, सकाळी उठल्यानंतर त्यांनी तीन वेळा दीर्घ श्वास घेतला आणि प्राण सोडले अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

पंडित जसराज यांचा जन्म 28 जानेवारी 1930 रोजी झाला. जसराज हे गेल्या 80 वर्षांहून अधिक काळ संगीत क्षेत्रात कार्यरत होते. संगीत क्षेत्रातील अनेक प्रमुख पुरस्कार त्यांना मिळाले होते. मेवाती घराण्याशी संबंध असलेल्या पंडित जसराज यांच्या निधनाने शास्त्रीय गायन क्षेत्रावर मोठी शोककळा पसरली आहे.

पंडित जसराज यांना मिळालेले पुरस्कार
पद्मश्री – 1975
संगीत नाटक अकादमी पुरस्कार – 1987
पद्म भूषण – 1990
पद्म विभूषण – 2000
पु. लं. देशपांडे जीवनगौरव पुरस्कार – 2012
भारत रत्न भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार – 2013
गंगुबाई हनगल जीवनगौरव पुरस्कार – 2016

पंडित जसराज यांचं काम ऐवढं मोठं आहे की आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघानं (आयएयू) 11 नोव्हेंबर 2006 रोजी सापडलेल्या एका ग्रहाला पंडित जसराज यांच्या सन्मानार्थ “पंडितजराज” असं नाव दिलं आहे. त्यामुळे त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. पंडित जसराज 90 वर्षांचे होते. न्यूजर्सीत शिष्य आणि परिवारासमवेत त्यांचं वास्तव्य होतं. आज सकाळी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. रुग्णालयात दाखल व्हायला मात्र त्यांनी नकार दिला. दीर्घश्वास घेतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. पंडित जसराज यांना 2000 साली पद्मविभूषण सन्मान देण्यात आला होता. याशिवाय संगीत नाटक अकादमीच्या सन्मानानेही त्यांना गौरवण्यात आलं होतं.

हरियाणात जन्मलेल्या जसराज यांचे महाराष्ट्राशी अधिक ऋणानुबंध होते. त्यांची पत्नी मधुरा मराठी आहेत. चित्रमहर्षी व्ही. शांताराम यांच्या कन्या मधुरा शांताराम यांच्याशी 1962 मध्ये त्यांचा विवाह झाला. पंडित जसराज यांनी मराठी गीतेही गायली आहेत. भारताबरोबरच जगभरात पंडित जसराज यांचे शिष्य आहेत. अमेरिका आणि कॅनडातही अनेक वर्षं त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे धडे कित्येकांना दिले.

परभणी : येलदरी धरणाचे १० दरवाजे उघडले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या