21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeराष्ट्रीयकोविशिल्ड लस सुरक्षित असल्याचा सिरमकडून पुनरुच्चार

कोविशिल्ड लस सुरक्षित असल्याचा सिरमकडून पुनरुच्चार

एकमत ऑनलाईन

पुणे : कोरोनावर तयार करण्यात येत असलेल्या कोविशिल्ड लसीबद्दल एका स्वयंसेवकाने धक्कादायक आरोप केले होते. आरोपानंतर लसीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, चेन्नईतील स्वयंसेवकाने केलेले आरोप सिरमने पुन्हा फेटाळून लावले आहेत. कोविशिल्डची लस घेतलेल्या चेन्नईतील एका स्वयंसेवकाने न्युरॉलॉजिकल ब्रेकडाऊन आणि विचार करण्याची क्षमता कमी झाल्याचा आरोप केला होता. सिरम इन्स्टीट्यूट आणि अन्य काही जणांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. पाच कोटी रूपयांची नुकसान भरपाई मागितली होती. लसीची चाचणीही थांबवण्याची मागणी केली होती. मात्र, हे आरोप सिरमने फेटाळून लावले आहेत.

कोविशिल्ड लस सुरक्षित व रोगप्रतिकारक आहे. चेन्नईच्या स्वयंसेवकांसोबत झालेली बाब दुर्दैवी आहे. मात्र, ही घटना कोविशिल्ड लसीमुळे घडलेली नाही. लस निर्मिती करताना सर्व नियम, मार्गदर्शक सूचना व प्रक्रियेचे काटेकोर पालन केल्यााचेही सिरमने सांगितले आहे. दोन दिवसांपूर्वीही सिरमने आरोपकर्त्याचे आरोप फेटाळून लावले होते.

कोणताही दुष्परिणाम नाही :डॉ. श्रीवास्तव
दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या मुख्य न्यूरोसाइंसेज डॉ. एम. व्ही. पद्मा श्रीवास्तव यांनीही काही दिवसांपुर्वी कोव्हॅक्सीन या लशीच्या तिस-या टप्प्यातील चाचणीत सहभाग घेतला होता. लसीचा आपल्यावर कोणताही दुष्परिणाम झाला नाही, असा दावा त्यांनी केला आहे. भारताने कोविड-१९ पसरवणा-या नॉव्हेल कोरोना विषाणूला वेगळे करण्यात यश प्राप्त केले आहे. आता भारत स्वस्त करोना लस बनवण्याच्या मार्गावर आघाडी घेत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

माथेफिरूकडून कुटुंबातील चौघांची हत्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या