24.7 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeराष्ट्रीयझारखंडमध्येही हाथरसची पुनरावृत्ती

झारखंडमध्येही हाथरसची पुनरावृत्ती

एकमत ऑनलाईन

रांची : गिरिडिह येथील पंधरा वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिला जिवंत जाळल्याप्रकरणी झालेला तात्पुरत्या स्वरूपातील तपासावरून झारखंड उच्च न्यायालयाने पोलिसांना खडे बोल सुनावले असून, हाथरस केवळ उत्तर प्रदेशमध्ये नाही, तर झारखंडमध्येदेखील आहे, अशी कठोर टिप्पणी केली आहे.

पीडितेच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी देताना न्या. आनंद सेन यांनी पोलिसांचा तपास हा तपासाच्या नावाखाली केलेली धूळफेक आहे, असे नमूद केले; तसेच पोलिस महासंचालक एम. व्ही. राव यांना या प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करण्याची सूचनादेखील केली. गिरिडिह येथे राहणा-या पंधरा वर्षीय मुलीवर बलात्कार करून नंतर तिच्यावर रॉकेल टाकून तिला जिवंत पेटवून देण्यात आले होते.

पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपीला त्या क्षणी पकडलेदेखील होते. मात्र, त्याचे नातेवाइक त्याला सोडवून घेऊन गेले, अशी नोंद ३० मार्च रोजी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये आहे.

परतीच्या पावसाचा दणका

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या