37.8 C
Latur
Monday, May 29, 2023
Homeराष्ट्रीयराज्यसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र

राज्यसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र

- गुजरातमध्ये आणखी एका आमदाराचा राजीनामा - राजकीय समीकरण बदलले

एकमत ऑनलाईन

अहमदाबाद : वृत्तसंस्था
गुजरातमध्ये १९ जून रोजी होणाºया राज्यसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये राजीनाम्याचे सत्र सुरूच आहे. गुजरातमधील काँग्रेसचे आणखी एक आमदार बृजेश मेरजा यांनी आज दि़ ५ जून रोजी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अगदी दोनच दिवसांपूर्वी काँग्रेसचे दोन आमदार अक्षय पटेल आणि जीतू चौधरी यांनी राजीनामा दिला होता. गुजरातचे विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी राजीनामे मंजूरही केले आहेत.

गुजरात काँग्रेसला अलिकडच्या काळात ग्रहण लागल्याचे चिन्ह आहे. गेल्या तीन महिन्यात गुजरात काँग्रेसच्या ६ आमदारांनी राजीनामा दिला आहे. त्यात आज आणखी एका आमदाराची भर पडली. ऐन राज्यसभा निवडणुकीच्या तोंडारवर हे राजीनामा सत्र सुरू असल्याने गुजरात काँग्रेसला जबर धक्का बसला आहे.

मार्चपासून ८ आमदारांनी सोडली साथ
गुजरात काँग्रेससाठी हा संघर्षाचा काळ दिसत आहे. कारण, एकानंतर एक आमदार पक्षाला रामराम करत आहे. मार्चपासून आतापर्यंत काँग्रेसच्या ८ आमदारांनी राजीनामे दिले आहेत. गुजरातमध्ये काँग्रेसचे आता केवळ ६५ आमदार उरले आहेत. गुजरात विधानसभेच्या १७२ जागांपैकी १० जागा रिकाम्या आहेत. गुजरातमधील राज्यसभेच्या चार जागांसाठी १९ जूनला निवडणूक होणार आहे. यापैकी तीन जागा सध्या भाजपकडे आहेत, तर एक काँग्रेसकडे आहे. गुजरातमध्ये २०१७ साली भाजपने काँग्रेस नेते अहमद पटेल यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. तीच परिस्थिती आता आहे. त्यावेळी पटेल काठावर पास झाले होते. आता काय होणार याकडे राजकीय तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे.

Read More  नांदेड जिल्ह्यात कोरोनाबाधितांमध्ये ७ व्यक्तींची भर

भाजपचे पारडे जड
राज्यसभेच्या चार जागांसाठी भाजपच्या तीन आणि काँग्रेसच्या दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. आतापर्यंतच्या समीकरणानुसार, भाजपला फक्त दोन जागा जिंकणे शक्य होते. पण काँग्रेसच्या ८ आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे तिसºया जागेवरही भाजपचे पारडे जड मानले जात आहे. आता चौथ्या जागेसाठी इतर आमदारांची मते महत्त्वाची असतील. विधानसभेचे बीटीपीचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेस एक आणि एक अपक्ष उमेदवार जिग्नेश मेवाणी यांचा समावेश आहे. काँग्रेसच्या नजरा आता या आमदारांवर आहेत.

राष्ट्रवादीतही उलथापालथ
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन दिग्गज नेते शंकरसिंग वाघेला यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. आगामी स्थानिक आणि विधानसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये स्वत:चे उमेदवार उभे करणार असल्याचे वाघेला म्हणाले. राष्ट्रवादीचे गुजरातमधील एकमेव आमदार कंधाल जाडेजा हे १९ जूनला कुणाला पाठिंबा देणार यावरुन वाघेलांविरोधातच गट तयार झाला होता. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच वाघेला यांची हकालपट्टी करण्यात आली. आता पक्षात थांबणे शक्य नसून काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादीच्या पांिठब्याविना उमेदवार उभे करणार असल्याचे ते म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या