नवी दिल्ली : ई-कॉमर्स वेबसाइट्सवरील बनावट रिव् ुजवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने एक फ्रेमवर्क विकसित करणार आहे. या संदर्भात ग्राहक व्यवहार मंत्रालयाने शनिवारी माहिती दिली. ग्राहक व्यवहार विभाग भारतातील ई-कॉमर्स संस्थांद्वारे अवलंबत असलेल्या सध्याच्या यंत्रणेवर जागतिक स्तरावर सुरु असलेल्या वेगवेगळ्या पद्धतींचा अभ्यास करणार आहे आणि त्यानंतरच ही फ्रेमवर्क विकसित केली जाणार.
वाणिज्य संस्था, ग्राहक मंच, कायदा विद्यापीठे, वकील, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री यांसारख्या विविध पार्टनरसह अॅडव्हर्टायझिंग कौंन्सिल ऑफ इंडियाच्या सहकार्याने ग्राहक व्यवहार विभागाने एका बैठकीत ई कॉमर्स वेबसाइट्सवरील खोट्या रिव् ुजवर चर्चा केली. ई-कॉमर्स साईटवर कोणतेही प्रोडक्ट खरेदी करताना ग्राहक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेले रिव्हयुज बघतात. मात्र अनेकदा हे रिव् ुज खोटे असल्याचे दिसून आले.
या प्रकरणाकडे बारकाईने निरीक्षण केले जावे आणि ग्राहकांच्या हितासाठी या समस्येचे निराकरण करावे, यासाठी एक फ्रेमवर्क केली जाणार आहे. ऍडव्हर्टायंिझग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाने बनावट आणि दिशाभूल करणा-या रिव्हयुजवर आणि ग्राहकांच्या हिताला हायलाइट करत हा निर्णय घेतला आहे.