26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeमहाराष्ट्ररिया न्यायालयीन कोठडीत २० ऑक्टोबरपर्यंत वाढ

रिया न्यायालयीन कोठडीत २० ऑक्टोबरपर्यंत वाढ

एकमत ऑनलाईन

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात पुरत्या अडकलेल्या रिया चक्रवर्तीच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सुशांत प्रकरणात तुरुंगात असलेल्या रिया चक्रवर्तीच्या न्यायलयीन कोठडीत २० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान रिया आणि शौविक यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने दोघांचाही जामीन अर्ज फेटाळला. या आधीही न्यायालयाने दोन वेळा रियाचा जामीन अर्ज फेटाळला होता.

तत्पूर्वी, रिया चक्रवर्तीच्या न्यायलयीन कोठडीत ६ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली होती. दरम्यान रिया आणि शौविक यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने दोघांचाही जामीन अर्ज फेटाळला. या आधीही न्यायालयाने दोन वेळा रियाचा जामीन अर्ज फेटाळला होता. जर या प्रकरणी रिया दोषी आढळल्यास तिला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. 8 सप्टेंबर रोजी रियाला अटक केल्यानंतर तिची रवानगी भायखळा तुरुंगात करण्यात आली होती.

जिल्ह्यात अवैध मद्य विक्रीवर छापे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या