32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeराष्ट्रीयरिक्षाचालकाचा सन्मान :१ लाख ४० हजारांची रक्कम पोलिसांकडे केली परत

रिक्षाचालकाचा सन्मान :१ लाख ४० हजारांची रक्कम पोलिसांकडे केली परत

एकमत ऑनलाईन

हैदराबाद :   रिक्षाच्या तोडक्यामोडक्या कमाईवर घर चालवणाऱ्या हबीबला रिक्षेत घबाड सापडलं. आर्थिक अडचण असतानाही हबीबने आपल्या रिक्षात एक लाखापेक्षा जास्त रक्कम विसरुन गेलेल्या महिला प्रवाशाचे पैसे जबाबदारीने पोलिसांकडे परत केले. सुदैवाने आपण पैसे विसरल्याचं महिला प्रवाशाला लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि या प्रवाशाला पैसे परत मिळाले. रिक्षाचालकाने दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे पोलिसांनी त्याचा हार घालून सत्कार केला.

काही दिवसांपूर्वी सिद्दी अंबर बाझार परिसरात मोहम्मदने आपल्या रिक्षातून दोन महिलांना सोडलं होतं. यानंतर दुपारी अडीच वाजल्याच्या दरम्यान मोहम्मद आपल्या नेहमीच्या स्टँडवर परतला. यावेळी प्रवासी सीटकडे त्याची नजर गेली असतान मोहम्महला एक बॅग दिसली. या बॅगेत कोणती बॉम्ब तर नसेल ना या भीतीपोटी मोहम्मदने आपल्या रिक्षामालकाला ती बॅग दाखवली. बॅग तपासली असता त्यात पैसे असल्याचं कळलं. त्या बॅगेत १ लाख ४० हजारांची रक्कम होती. नेमक्या कोणत्या प्रवाशाचे पैसे आहेत हे शोधण्याऐवजी हबीबने स्थानिक पोलीस ठाण्यात हे पैसे परत करण्याचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे हबीबने ते पैसे पोलिसांच्या स्वाधिन केले. त्याआधी पैशांची खरी मालक असलेल्या आयेशा या महिलेने पोलीस ठाण्यात आपली बॅग हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

चौकशी केली असतान रिक्षाचालकाने परतवलेली बॅग हीच आयेशा यांची बॅग होती हे तपास करून त्यांना परत केली. यात कोणत्याही प्रकारची अधिकृत तक्रार दाखल झाली नव्हती त्यामुळे आम्ही लगेचच ते पैसे आयेशा यांच्या ताब्यात दिल्याची माहिती स्थानिक पोलीस अधिकारी के. सुदर्शन यांनी दिली. मोहम्मद हबीब याने दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे आयेशा यांनी त्याला ५ हजार रुपये बक्षीस दिलं. पोलिसांनीही मोहम्मदचा शाल-श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन, हार घालून सत्कार करण्यात आला.

लातूर जिल्ह्यात आढळले १९८ रुग्ण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या