26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeराष्ट्रीयउत्तर गोलार्धातून दिसले रिंग ऑफ फायर

उत्तर गोलार्धातून दिसले रिंग ऑफ फायर

एकमत ऑनलाईन

मुंबई : या वर्षातील पहिले कंकणाकृती सूर्यग्रहण गुरुवारी झाले. मुख्यत: उत्तर गोलार्धातील ईशान्य कॅनडा, ग्रीनलँड व सायबेरियाच्या भागांमधून कंकणाकृती सूर्यग्रहण पाहता आले. कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून जरी दिसले नसले तरी खगोलप्रेमी नागरिक, विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या माध्यमातून हे कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची पर्वणी मिळाली.

जेव्हा सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याच्या प्रकाशाला झाकून टाकतो, तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्यास मिळते. या सूर्यग्रहणात चंद्र जास्त अंतरावर असल्यामुळे तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. अशावेळी सूर्याची वर्तुळाकार कडी चंद्राच्या पाठीमागे एखाद्या कंकणासारखी म्हणजे बांगडीसारखी दिसून येते, त्यालाच कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात. कंकणाकृती सूर्यग्रहणच्या या स्थितीला खगोलप्रेमी रिंग ऑफ फायर, अग्निवलय, अग्निकंकण असेही संबोधतात. जेव्हा चंद्र सूर्याच्या थोडासा आड आल्यामुळे सूर्याचा थोडासा भाग झाकला जातो, या ग्रहणास खंडग्रास किंवा अल्पग्रास किंवा आंशिक ग्रहण म्हणतात.

लडाख, अरुणाचलमध्ये दर्शन
आंशिक ग्रहणाचा शेवट मध्य चीन येथून संध्याकाळी ६ वाजून ४२ मिनिटांनी झाला. भारतातून लडाख व अरुणाचल प्रदेश येथील नागरिकांना सूर्यास्ताच्या अगोदर ५ ते ७ मिनिटे आंशिक ग्रहण पाहता आले, अशी माहिती शिवाजी विद्यापीठाच्या अवकाश संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ. राजीव व्हटकर यांनी दिली.

मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या