25.4 C
Latur
Monday, May 17, 2021
Homeराष्ट्रीयपरकीय चलनात वाढ

परकीय चलनात वाढ

एकमत ऑनलाईन

मुंबई : दिवाळीच्या मुहूर्तावर देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नुकतीच परकीय चलनाची आकडेवारी जाहीर झाली आहे. ६ नोव्हेंबरच्या आठवड्यामध्ये देशाकडे तब्बल ५६८.४९ अब्ज डॉलर्स इतके परदेशी चलन आहे. हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. परदेशी चलनाचा साठा ८ अब्ज डॉलर्सने वाढला आहे. ३० ऑक्टोबर रोजीच्या आठवड्यामध्ये देशाकडे परदेशी गुंतवणुकीमध्ये १८़३ डॉलर्सची वाढ झाली होती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याबाबत माहिती दिली आहे.

परकीय चलन म्हणजे फॉरेन करन्सीमध्ये वाढ झाल्यामुळे आपल्या देशाला अनेक फायदे होणार आहेत. दर आठवड्याला हे आकडे मोजले जातात. एकीकडे कोरोनाच्या संकटामुळे मंदीचे वातावरण असतानाही देशामध्ये परदेशी चलन वाढणे ही अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक बाब आहे. परदेशी चलनामध्ये सलग दुस-या महिन्यात घसशीत वाढ झाली आहे.

वाढत्या चलनाने आयातीत वाढ
आरबीआयच्या माहितीनुसार, परकीय मालमत्ता चलनामध्ये ७.७७९ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. परकीय चलन डॉलरमध्ये मोजले जाते़ त्यामध्ये युरो, पाऊंड, येन यासारख्या इतर परकीय चलनांचीही मोजमाप असते. जगभरात डॉलरच्या माध्यमातून व्यवहार केले जातात. परकीय चलन वाढल्यामुळे आता आपला देश जास्त आयात करू शकतो.

सोने साठ्यातही वाढ
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, ६ नोव्हेंबरला संपलेल्या आठवड्यामध्ये देशातील सुवर्ण भांडारामध्ये १.३२८ अब्जाची वाढ झाली आहे. त्यामुळे सुवर्ण भांडार ३७.५८७ अब्ज डॉलरवर गेला. हे आकडे नक्कीच सकारात्मक आहेत.

अलकायदाचा दहशतवादी ठार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,496FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या