18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeराष्ट्रीयइंधनदरात पुन्हा वाढ

इंधनदरात पुन्हा वाढ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सप्टेंबर महिन्यापासून पेट्रोल-डिझेल दरात सतत वाढ होत आहे. सरकारी तेल कंपन्यांनी बुधवार दि. १३ ऑक्टोबर रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. आज इंधन दर स्थिर आहे. राजधानी दिल्लीत आज पेट्रोल १०४.४४ रुपये प्रति लीटर आहे. तर डिझेल ९३.१८ रुपये प्रति लीटर आहे. रविवारी पेट्रोलचा भाव ३० पैसे प्रति लीटरने वाढला होता. तर डिझेल दर ३५ पैसे प्रति लीटरने महागले होते. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती या महिन्याच्या सुरुवातीपासून दररोज वाढत्या होत्या. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या १० दिवसांत पेट्रोल २.८० रुपयांनी महागले, तर डिझेल किंमतीत ३.३० रुपयांची वाढ झाली.

महागाईचा भडका पुन्हा एकदा वाढला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीसोबतच दरम्यान सीएनजीच्या किंमतीत वाढ होत आहे. यासह, स्वयंपाकी गॅससाठी पाईपलाईन म्हणजेच नैसर्गिक वायूचा (पीएनजी) वापरही वाढला आहे. भारतात एलपीजी गॅसची किंमत तेल कंपन्या ठरवतात. भारतात जवळपास अधिकाधिक घरांमध्ये एलपीजी कनेक्शन आहेत. या गॅसचा उपयोग खासकरुन स्वयंपाकासाठी केला जातो. एलपीजी गॅसच्या किमतीत झालेली वाढ ही खास करुन सर्वसामान्य नागरिकांवर परिणाम करते.

सीएनजी-पीएनजी-एलपीजी महागला
एलपीजीही आता महाग झाला असून पीएनजीच्या स्वरूपात वापरलेला एलपीजी देखील महाग झाला आहे. दिल्लीत त्याची किंमत ३३.०१ एससीएम ऐवजी ३५.११ रुपयांवर गेली आहे. नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये ते ३२.८६ रुपयांऐवजी ३४.८६ रुपये झाले आहे. त्याचप्रमाणे, आता गुरुग्राममध्ये त्याची किंमत ३३.३१ क्यूबिक मीटर आणि रेवाडी आणि कर्नालमध्ये ३३.९२ प्रति क्यूबिक मीटर झाली आहे. मुझफ्फरनगर, मेरठ आणि शामली येथेही किमती वाढल्या आहेत. आता पीएनजीला येथे ३८.३७ रुपये मिळतील. बुधवारी सकाळी १० वाजल्यापासून दिल्लीत सीएनजी ४९.७६ रुपये प्रति किलो उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे, पीएनजीलाही दिल्लीमध्ये प्रति एससीएम ३५.११ रुपये मिळतील. दिल्लीमध्ये सीएनजी २.२८ रुपये प्रति किलो महाग झाले आहे, तर पीएनजी २.१० रुपये प्रति एससीएम महाग झाले आहे.

तेलाच्या किंमती वाढल्याने दरात वाढ
देशभरात जवळपास २६ राज्यात पेट्रोलचा दर १०० रुपयांवर पोहोचला आहे. यात मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लडाख सामिल आहे. त्याशिवाय महानगरात मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये पेट्रोल आधीपासूनच १०० रुपये प्रति लीटरवर पोहोचलं आहे. मुंबईत पेट्रोलचा दर सर्वाधिक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्याकिंमती वाढल्याने देशात पेट्रोल-डिझेल दरात वाढ होत आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या