25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeराष्ट्रीयअकारण सिटीस्कॅन केल्यास कॅन्सरचा धोका

अकारण सिटीस्कॅन केल्यास कॅन्सरचा धोका

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनाच्या भीतीपोटी अनेक जण सिटी स्कॅन करतात. मात्र, अशा सिटी स्कॅनचा कोणताही फायदा होत नाही. उलट अकारण सिटी स्कॅन केल्यास कर्करोगासारख्या आजारांना निमंत्रण मिळू शकते, असे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले आहे. कारण एक सिटीस्कॅनमुळे ३०० एक्सरेएवढे रेडिएशन होते. यातून कॅन्सरचा धोका वाढतो, असे ते म्हणाले.

खरे तर गरज पडल्यास डॉक्टर सिटीस्कॅन करण्यास सांगतात. मात्र, स्वत: डॉक्टर बनण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, असेही डॉ. गुलेरिया यांनी म्हटले आहे. जी व्यक्ती वेळोवेळी सिटीस्कॅन करते, ती व्यक्ती स्वत: होऊन धोका वाढवत आहे, हे लक्षात घ्यावे. कारण वारंवार सिटीस्कॅन केल्याने कॅन्सरचा धोका वाढणार आहे, असेही त्यांनी सांगितले. मुळातच कोरोनाच्या सुरुवातीला सीटी स्कॅन करून काहीच फायदा नाही. कित्येक वेळा पॅचेस दिसतात. मात्र, उपचाराअंती ते नाहीसे होते.

एका सीटी स्कॅनमध्ये ३०० एक्सरेच्या बरोबरीचे रेडिएशन असतात. त्यामुळे कर्करोगासारख्या आजारांना निमंत्रण मिळण्याची शक्यता आहे. चेस्ट एक्सरेनंतर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच सीटी स्कॅन करण्याचे ठरवावे, असा सल्ला डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला. काही जण दर तीन महिन्यानंतर सीटी स्कॅन करत आहेत. हे पूर्णत: चुकीचे आहे. स्वत:हून डॉक्टर बनू नका. साधी लक्षणे असणारे औषधाने बरे होतात. त्यासाठी स्टेरॉईड घेण्याची गरज नाही, असे त्यांनी सांगितले.

‘सीरम’ने महाराष्ट्राला लस देताना झुकते माप द्यावे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या