26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयभररस्त्यात आरजेडी नेत्याची गोळ्या झाडून हत्या

भररस्त्यात आरजेडी नेत्याची गोळ्या झाडून हत्या

एकमत ऑनलाईन

रोहतास : बिहारमधील रोहतास जिल्ह्यात गुन्हेगारांनी मोठी घटना घडवली. जिल्ह्यातील करगहर इथे पीएसीएसचे अध्यक्ष विजेंदर यादव यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. विजेंदर यादव हे करगहरचे प्रमुख असून सध्या ते पीएसीएसचे अध्यक्ष देखील आहेत.

गेल्या तीन दशकांपासून ते लालू प्रसाद यादव आणि आरजेडीशी संबंधित होते, तसेच तेजस्वी यादव यांच्या जवळचे मानले जात होते. आज (रविवार) सकाळी ते काही मजुरांसह त्यांच्या भातशेतीत गेले असता दुचाकीवरून आलेल्या दोन गुन्हेगारांनी त्यांची माहिती जाणून घेतली आणि काही वैयक्तिक बोलण्याच्या बहाण्याने शेताशेजारील रस्त्यावर बोलावले. थोडा वेळ बोलल्यानंतर त्यांच्या मानेवर व डोक्यात मागून गोळी झाडली. त्यामुळे विजेंदर यादव यांचा जागीच मृत्यू झाला.

शेतात काम करणा-या मजुरांना गोळीबाराचा आवाज आल्याने ते रस्त्यावर धावत आले. तोपर्यंत दुचाकीस्वार शस्त्रे उगारुन तेथून पळून गेले. यात आरजेडी नेत्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. त्याचवेळी काही वेळाने करगहर पोलिस ठाण्याचे पोलिसही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या