27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयदिल्लीत रोबोट विझवणार आग

दिल्लीत रोबोट विझवणार आग

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिल्ली सरकारने दिल्लीच्या अग्निशमन विभागाच्या ताफ्यात दोन फायर फायटर रोबोटचा समावेश केला आहे. रोबोटच्या मदतीने आग विझवणारे दिल्ली हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. अनेक देशांतील टेक्नॉलॉजीची गती आपण दिवसेंदिवस पाहतोच. याच टेक्नॉलॉजीचा आता भारतातही वापर केला जात आहे. ही टेक्नॉलॉजी म्हणजे फायर फायटर रोबोट. दिल्ली सरकारने दिल्लीच्या अग्निशमन विभागाच्या ताफ्यात दोन फायर फायटर रोबोटचा समावेश केला आहे. हे रिमोट कंट्रोल फायर फायटिंग रोबोट दिल्लीच्या अरुंद गल्ल्या, गोदामे, तळघर, जंगलातील आग, भूगर्भातील आणि सर्व मानवी जोखीम क्षेत्रे, तेल आणि रासायनिक टँकर, कारखाने या ठिकाणी सहज पोहोचू शकतात. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करून सांगितले की, आमच्या सरकारने रिमोट कंट्रोल्ड फायर फायटिंग मशीन्स खरेदी केल्या आहेत. आता आमचे शूर फायरमन १०० मीटर अंतरावरून आगीशी लढू शकतात. यामुळे नुकसान कमी होईल आणि लोकांचे जीव वाचतील.

अग्निशामकांच्या जीवाला कमी धोका
गृहमंत्री सत्येंद्र जैन म्हणाले की, रिमोट कंट्रोल रोबोट अग्निशमन दलासाठी फायदेशीर ठरतील. ते आल्यानंतर अग्निशमन विभागाच्या कर्मचा-यांना जीव धोक्यात घालण्याची गरज पडणार नाही. इतकेच नाही तर हे रोबोट २४०० लिटर प्रति मिनिट या वेगाने पाण्याचा दाब उच्च दाबाने सोडतात. या रोबोटला जोडलेल्या वायरलेस रिमोटद्वारे स्प्रे आणि स्ािंपल वॉटर स्क्विर्ट, दोन्ही ऑपरेट करता येतात. म्हणजेच ज्या ठिकाणी आग पाण्याने आटोक्यात येत नाही, त्या ठिकाणी रोबोटमधून बाहेर पडणारी रसायने आणि त्यातून निघणारा फेस आगीवर नियंत्रण मिळवेल.

अग्निशामक रोबोटचे वैशिष्ट्य
रोबोट रिमोट कंट्रोलद्वारे चालवला जातो. रोबोट अशा मटेरियलचा बनलेला आहे,ज्यावर आग, धूर, उष्णता यांचा परिणाम होत नाही. यात व्हेंटिलेशन फॅन देखील आहे, ज्याचा वापर मशीन थंड ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. ते एकाच वेळी सुमारे १०० मीटर क्षेत्र व्यापू शकते आणि आग त्वरित विझवण्यास सक्षम आहे.

रोबोटिक फायर फायटिंग मशीनची वैशिष्ट्ये
हा रोबोट ३०० मीटर अंतरावरून चालवता येतो. आग, धूर, उष्णता किंवा इतर कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीचा कोणताही परिणाम होणार नाही. यात आर्मी टँकसारखी ट्रॅक सिस्टीम आहे, ज्याद्वारे हा रोबोट सहज पाय-यांवर चालू शकतो. उंच इमारती, कारखाने, भूमिगत ठिकाणी आग विझवण्यासाठी हा रोबोट सहज वापरता येतो. यात १४० अश्वशक्तीचे इंजिन आहे. तसेच, वॉटर शॉवरसाठी अनेक नोजल आहेत. गरजेनुसार त्यात बदल करता येतो. रोबो ताशी चार किलोमीटर वेगाने धावू शकतो. रोबोमध्ये कॅमेरे आहेत जे आग लागलेल्या इमारतीतील परिस्थितीचा आढावा घेऊ शकतात. रोबोटच्या मागील बाजूस एक पाईप जोडला जाईल, ज्यामुळे तो बाहेर उभ्या असलेल्या टँकरमधून पाणी काढू शकेल आणि आतून सर्वत्र पाणी फवारू शकेल. त्यामुळे कमी वेळात कोणतीही जोखीम न घेता आगीवर नियंत्रण मिळवता येते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या