37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeराष्ट्रीयबँकांच्या एटीएम मशीनमधून २००० रुपयांच्या नोटा येत नाहीत?

बँकांच्या एटीएम मशीनमधून २००० रुपयांच्या नोटा येत नाहीत?

एकमत ऑनलाईन

मुंबई : गेल्या काही काळापासून अनेक बँकांच्या एटीएम मशीनमधून २००० रुपयांच्या नोटा येत नाहीत. काही बँकांनी तर २००० रुपयांच्या नोटा ठेवू नयेत अशी अधिकृत घोषणाही केली. एटीएममधून दोन हजारच्या नोटा का येत नाहीयेत असा प्रश्न देखील काहींना पडला असेल. आता रिझर्व्ह बँकेने २०००च्या नोटांबद्दल माहिती दिली आहे. गेल्या एका वर्षात २००० रुपयांच्या नोटा छापलेल्या नाहीत, असे आरबीआयने सांगितले. याचा अर्थ बाजारात २ हजार रुपयांची नवीन नोट नाही आहे.

रिझर्व्ह बँकेच्या २०१९-२० च्या वार्षिक अहवालानुसार मार्च २०१८ अखेरपर्यंत प्रचलित असलेल्या २,००० नोटांची संख्या ३३,६३२ लाख होती, जी मार्च २०१९ अखेर ३२,९१० लाखांवर आली. मार्च २०२० च्या अखेरीस २ हजाराच्या नोटांची संख्या कमी होऊन २७,३९८ लाख झाली आहे. या अहवालानुसार मार्च २०२० च्या अखेरीस एकूण चलनात २,००० च्या नोटांचा वाटा २.४ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. मार्च, २०१९ अखेर ३ टक्के आणि मार्च अखेर ३.३ टक्के होता.

मूल्याच्या दृष्टीनेही दोन हजारांच्या नोटांचा वाटा कमी झाला आहे. आकडेवारीनुसार, मार्च २०२० पर्यंत, प्रचलित एकूण चलनाच्या मूल्यातील २,००० नोटांचा वाटा २२.६ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. मार्च, २०१९ अखेर ३१.२ टक्के आणि मार्च अखेर ३७.३ टक्के होता. अहवालानुसार, २०१८ पासून तीन वर्षांच्या कालावधीत ५०० आणि २०० रुपयांच्या नोटांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

अहवालात म्हटले आहे की २०१९-२० मध्ये २००० च्या नोटा छापण्यासाठी कोणताही आदेश देण्यात आला नव्हता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नोट प्रिंटिंग प्रायव्हेट लिमिटेड (बीआरबीएनएमपीएल) आणि सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (एसपीएमसीआयएल) कडून २ हजारांच्या नोटांचा नवीन पुरवठा झाला नाही. २०१९-२०२० मध्ये, नोटांच्या ऑर्डर एका वर्षाच्या तुलनेत १३.१ टक्क्यांनी कमी आहेत. अहवालात म्हटले आहे की, २०१९-२० मध्ये नोटा पुरवठा देखील मागील वर्षाच्या तुलनेत २३.३ टक्के कमी होता.

कर्नाटकात प्रवासी वाहतुकीवरील सर्व निर्बंध रद्द करण्यात आले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या