22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeराष्ट्रीयरुद्रम-१ ची चाचणी यशस्वी

रुद्रम-१ ची चाचणी यशस्वी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : डिफेन्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट आॅर्गनायझेशनने (डीआरडीओ) शुक्रवार दि़ ९ आॅक्टोबर रोजी भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. डीआरडीओद्वारे तयार करण्यात आलेल्या अँटी रेडीएशन मिसाईल रुद्रम-१ क्षेपणास्त्राची सुखोई-३०द्वारे यशस्वी चाचणी करण्यात आली.

डीआरडीओतर्फे ओडिसाच्या समुद्र किनारी असलेल्या तटावर सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी रुद्रम-१चं यशस्वी परीक्षण करण्यात आले. संपूर्ण स्वदेशी बनावटीचे (मेड इन इंडिया) असलेले रुद्रम-१ हे क्षेपणास्त्र शत्रूवर कितीही उंचावर डागले जाऊ शकते. तसेच कुठल्याही प्रकारच्या सिग्नल तसेच रेडीएशन पकडण्यासाठी तत्पर आहे. त्याशिवाय आपल्या रडारमध्ये रेडीएशन घेऊन नष्टही करू शकते. विशेष म्हणेजे रुद्रम-१ या क्षेपणास्त्राला सुखोई आणि तेजस या दोन्ही लढाऊ विमानांमध्ये वापरले जाऊ शकते.

चाचणी यशस्वी झाली असली तरीही रुद्रम-१ या क्षेपणास्त्रात अद्याप काही बदल अपेक्षित आहेत. विकसित करण्याच्या दृष्टीने शुक्रवारी चाचणी करण्यात आली. आठवड्याच्या सुरुवातीलाच डीआरडीओने सुपरसोनिक मिसाइल असिस्टेड रिलीज आॅफ टॉरपीडो (स्मार्ट) या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले होते.

सरंक्षण मंत्र्यांनी केले डीआरडीओचे अभिनंदन
रुद्रम-१ च्या यशस्वी परिक्षणानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचे अभिनंदन केलं आहे. संरक्षण क्षेत्रात भारताने आत्मनिर्भर बनण्याचे उद्दीष्ट्य ठेवले आहे. त्यादृष्टीने डीआरडीओचे महत्वाचे पाऊल असल्याचे काही दिवसांपूर्वी राजनाथ सिंह म्हणाले होते.

मी माझा मित्र गमावला- पंतप्रधान नरेंद्र मोदी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या