27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeराष्ट्रीयरुपयाने गाठला ऐतिहासिक नीच्चांकी दर

रुपयाने गाठला ऐतिहासिक नीच्चांकी दर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : डॉलरच्या तुलनेत आज रुपयाने ऐतिहासिक नीचांकी दर गाठला. एका डॉलरची किंमत ८० रुपयांहून अधिक झाली. मागील काही दिवसांपासून रुपयाच्या दरात मोठी घसरण सुरू आहे. विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर घसरत्या रुपयांच्या मुद्यावरून जोरदार टीका केली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांची विरोधात असतानाची डॉलर-रुपयांच्या किमतीबाबतची वक्तव्ये, भाषण व्हायरल केली जात आहेत. डॉलर आणि रुपयाचा दर ठरतो कसा, याबाबतही अनेकांना प्रश्न निर्माण झाले आहेत.

डॉलर हे जगातील सर्वात मोठे चलन आहे. जगभरातील बहुतांशी व्यापार डॉलरमध्ये होतो. आपण परदेशातून एखादी वस्तू मागवतो, त्या वस्तूचे पैसे डॉलरमध्ये द्यावे लागतात. त्याशिवाय आपण निर्यात करतो, तेव्हा त्याची रक्कमदेखील डॉलरमध्ये मिळते. सध्याच्या स्थितीत आपण आयात अधिक करत असून निर्यात त्या तुलनेत कमी होत आहे. त्यामुळेच आपण इतर देशांना डॉलर अधिक प्रमाणात देत आहोत आणि आपल्याला कमी डॉलर मिळत आहे. त्याचा फटका विदेशी गंगाजळीला बसत आहे.

कोणत्याही देशाच्या चलनाचे मूल्य अर्थशास्त्रातील मूलभूत सिद्धांत, मागणी आणि पुरवठा यावर आधारीत असते. फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये ज्या चलनाला अधिक मागणी असते, त्याची किंमत अधिक असते. ज्या चलनाची मागणी कमी असते, त्याची किंमतदेखील कमी असते. चलन मूल्य ठरवण्यासाठी ढीॅॅी िए७ूँंल्लॅी फं३ी हीदेखील एक पद्धत असते. ढीॅॅी िए७ूँंल्लॅी फं३ी म्हणजे फिक्स्ड एक्सचेंज दर असतो. यामध्ये एक देश दुस-या देशाच्या तुलनेत आपल्या चलनाचे मूल्य निश्चित करतो. नेपाळने भारतासोबत ढीॅॅी िए७ूँंल्लॅी फं३ी संकल्पना स्वीकारली आहे. त्यामुळे भारतीय एका रुपयाची किंमत नेपाळमध्ये १.६ नेपाळी रुपये इतकी असते. नेपाळशिवाय मध्य आशियातील काही देशांनीदेखील ही संकल्पना स्वीकारली आहे.

किंमत २० वर्षांच्या नीचांकी पातळीवर
डॉलरची किंमत फक्त रुपयाच्या तुलनेत वाढत नाही, तर चलनांवरही त्याचा परिणाम होत आहे. युरोपीयन युनियनचे चलन युरोची किंमत डॉलरच्या तुलनेत मागील २० वर्षाच्या नीच्चांकी पातळीवर आहे. काही दिवसांपूर्वी एक युरोची किंमत ही एक डॉलर इतकी झाली होती. वर्ष २००९ च्या आसपास हा विनिमय दर १.५ डॉलर इतका होता. यंदाच्या वर्षाच्या सहा महिन्यात डॉलरच्या तुलनेत युरोची किंमत ११ टक्के, येनची किंमत १९ टक्के आणि पौंडची किमत १३ टक्क्यांनी घसरली. रुपयांच्या दराशी तुलना करता ६ टक्क्यांची घसरण झाली आहे.

यामुळे वधारला दर?
रशिया-युक्रेन युद्धामुळे देशात अस्थिरता निर्माण झाली. मागणी आणि पुरवठ्याचे सूत्र बिघडले. गुंतवणूकदारांनी भीतीमुळे बाजारातून आपली गुंतवणूक काढून घेतली आणि इतर सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक केली. अमेरिकन गुंतवणूकदारांनी भारतासह युरोप आणि इतर देशांतूनही माघार घेतली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या