मुंबई : गंभीर जागतिक परिस्थितीमध्ये भारतीय अर्थव्यवस्था तुलनेने चांगल्या स्थितीत आहे असा दावा भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केला आहे. आरबीआयच्या वार्षिक बँकिंग परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते.
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रुपयाच्या घसरणीबाबत सांगितले की, रुपयामध्ये तीव्र चढउतार आणि अस्थिरता येऊ दिली जाणार नसून आरबीआय बाजारात यूएस डॉलरचा पुरवठा करत आहे. त्यामुळे रोखीचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करत असून आरबीआयच्या पावलांमुळे रुपयाचा व्यवहार सुरळीत होण्यास मदत झाली असल्याचे ते म्हणाले.
असुरक्षित परकीय चलनाच्या व्यवहारांबद्दल घाबरण्याऐवजी त्याकडे वस्तुस्थितीने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आरबीआय गव्हर्नर यांनी रेपो दरावरील प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, तरलता आणि दर वाढविण्याबाबत निर्णय घेताना आरबीआय नेहमीच विकासाचे लक्ष्य लक्षात ठेवते आणि त्यानुसार आरबीआयचे चलनविषयक धोरण धोरण समिती स्वत:ची पावले उचलते असे ते दास यांनी यावेळी स्पष्ट केले.