24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeराष्ट्रीयरुपया पुन्हा गडगडला!

रुपया पुन्हा गडगडला!

एकमत ऑनलाईन

मुंबई : डॉलरच्या तुलनेत रुपयाचे पुन्हा एकदा ऐतिसाहिक अवमुल्यने झाले आहे. २४ फेब्रुवारीनंतर रुपयाची ही दिवसभरातील सर्वात मोठी घसरण आहे. डॉलरच्या तुलनेत आजचा रुपयाचा दर हा ८०.८६ रुपयांवर घसरला, जो काल ७९.९७ रुपये इतका होता.

काल ७९.९७ रुपयांवर बंद झालेल्या रुपयाच्या व्यवहाराला आजच्या दिवशी ८०.२८ रुपयांनी सुरुवात झाली. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने आपल्या रेपो रेटमध्ये ७५ बेसिस पॉईंटने वाढ केल्याने त्याचा परिणाम भारतीय रुपयावर पहायला मिळाला. यामुळे भविष्यात देखील रुपयाची किंमत वाढण्याची चिन्ह असून सन २०२४ पर्यंत हा ट्रेंड कायम राहिले असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, आशियातील बहुतेक देशांच्या चलनांचे व्यवहार हे डॉलरच्या तुलनेत घसरणीने सुरु झाले. चीनचा युआन अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ७.१० वर पोहोचला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या